Karjat Bazar Samiti : फेरमतमोजणीत भाजप तोंडघशी : कर्जतमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे गटाला ९ जागा कायम

Karjat APMC News: भाजप उमेदवारांच्या पदरी पराभव कायम राहिला, पण, त्यांना ५० हजारांचा भुर्दंडही सहन करावा लागला आहे.
Rohit Pawar-Ram Shinde
Rohit Pawar-Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

कर्जत (जि. नगर) : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालात फेरमतमोजणीनंतरही कोणताही फेरबदल झालेला नाही. फेबरमतमोजणीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या गटाच्या प्रत्येकी नऊ जागा कायम राहिल्या आहेत. त्यामुळे सभापती आणि उपसभापती कोणाचा होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. फेरमतमोजणी करून भाजपचा गट तोंडघशी पडल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. (Rohit Pawar and Ram Shinde group retained 9 seats in Karjat Bazar samiti after recount)

फेरमतमोजणीमध्ये ग्रामपंचायत गटातील. सुवर्णा सतीश कळसकर यांचे एक मत कमी झाले आहे, तर सर्वसाधारण मतदारसंघातील गुलाब तनपुरे आणि संग्राम पाटील यांचे प्रत्येकी एक मत वाढले आहे. त्यापलीकडे जागांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आता कर्जत तालुक्याचे लक्ष सभापती आणि उपसभापती निवडीकडे लागले आहे.

Rohit Pawar-Ram Shinde
Vasantrao Kale Sugar Factory Election: कल्याणराव काळेंना पहिला धक्का; दीपक पवार, बी. पी. रोंगे यांचे अर्ज मंजूर

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीची (Bazar Samiti) निवडणुकीत (Election) राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजपचे माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांचे समर्थक आमने सामने आले होते. बाजार समितीची निवडणूक राज्यात गाजली होती. आमदार पवार आणि आमदार शिंदे यांच्या पॅनेलला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. मात्र, अवघ्या दोन मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांना व पक्षश्रेष्ठींना पराभव जिव्हारी लागला होते. आमदार राम शिंदे पॅनेलच्या कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण गटातील उमेदवार भरत पावणे आणि महिला राखीव गटातील लीलावती जामदार यांनी निकालाला आव्हान देत फेरमतमोजणीची मागणी केली होती.

Rohit Pawar-Ram Shinde
Makai Sugar Factory Election : मातब्बर विरोधकांचे अर्ज बाद; 'मकाई'ची सत्ता चौथ्यांदा मिळविण्याकडे बागलांची वाटचाल

नगर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांच्या समोर वादी-प्रतिवादी यांच्यात युक्तिवाद होत सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुखदेव सूर्यवंशी यांच्यासह उमेदवारांच्या साक्षी झाल्या.त्यानंतर जिल्हा उपनिबंधक श्री पुरी यांनी कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण गटातील एक व महिला राखीव गटातील एक आशा दोन जागासाठीही फेर मतमोजणी करण्याचे आदेश दिले होते.

Rohit Pawar-Ram Shinde
Solapur Politics: होय, माढा मतदारसंघात आम्ही काँग्रेस.....; नाना पटोले यांनी केले स्पष्ट

दोन्ही उमेदवारांनी प्रत्येकी ५० हजार रुपये शुल्क भरून आज फेरमतमोजणी झाली. मात्र, या फेरमोजणीतही भाजपच्या पदरी निराशाच पडली. निकालात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे भाजप उमेदवारांच्या पदरी पराभव कायम राहिला, पण, त्यांना ५० हजारांचा भुर्दंडही सहन करावा लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com