Nationalist Congress Party News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्हं नेमकं कोणाचं शरद पवार की अजित पवारांचं? याबाबत आता उद्यापासून निवडणूक आयोगासमोर नियमित सुनावणी पार पडणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी पक्ष आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावर दावा सांगितला असल्याने आयोग कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या संध्याकाळी चार वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे.
मागच्या सुनावणीवेळी शरद पवार यांच्या गटाकडून युक्तिवादावेळी अजित पवार गटाने बोगस प्रतिज्ञापत्र सादर केली असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. बनावट सदस्यांची २४ प्रकारची वर्गवारी करण्यात आली असून, आयोगाची कशा प्रकारे दिशाभूल करण्यात आली, याचा घटनाक्रम मांडण्यात आला असल्याचे सिंघवी यांच्याकडून सांगण्यात आले होते.
अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असल्याने उद्या शरद पवार गटाकडून युक्तिवाद होईल. उद्याच्या सुनावणीस शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढचे काही दिवस सुनावणी सलग होऊन आयोग निकाल राखून ठेवण्याची शक्यतादेखील आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.