Ahmednagar news : विरोधात असलेले महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी सरकारला आता आकडेवारी समोर मांडत उघडे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. माजीमंत्री आणि राहुरीचे राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विद्यमान महायुती सरकारवर असाच निशाणा साधला आहे.
हे सरकार केवळ घोषणाबाजी सरकार असल्याचे म्हणत घोषणा कोटींची आणि कामे शुन्य असा घणाघात केला आहे. मविआ सरकारमध्ये मंजूर कामावरील स्थगिती न्यायालयाकडून उठवल्यावर शुभारंभ आणि लोकार्पण कार्यक्रमात तनपुरे यांनी महायुती सरकारकरच्या कारभारावर ताशेरे ओढले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी 1 कोटी 85 लाख रुपये खर्च्याच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती लावली आणि मल्हारवाडी खिंडीत राहुरी ते ताहाराबाद रस्त्याचे कामाच्या शुभारंभ व मल्हारवाडी खिंड ते गाडे वस्ती रस्त्याचे कामाच्या लोकार्पण केले. या प्रसंगी बोलताना त्यांनी सरकारला चांगलेच घेरले.
राज्यातील सत्तेवर असलेले महायुती सरकार नुसते घोषणाबाजी करणारे सरकार असून कामांवर कोट्यावधी रुपये खर्चाची आकडेवारी ही नुसती कागदावरच असून कामासाठी आकडे कोटींचे पण कामे शून्य अशी अवस्था राज्यातील सत्तेवर असलेल्या सरकारची झाली असल्याची टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी आपल्या भाषणातून केली.
आमदार तनपुरे यावेळी म्हणाले की, राहुरी ताहाराबाद रस्ता काम राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अर्थ संकल्पात मंजूर झाले होते, मात्र सरकार बदलून महायुतीचे सरकारने सत्तेवर येताच या कामाला स्थगिती दिेली होती. या सरकारच्या कामांना स्थगिती देण्याचे निर्णयविरुद्धात तालुक्यात सायकल फेरी काढून मंजुरी न देणाऱ्या सरकार विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. तिथे न्यायालयाने या कामावरील स्थगिती उठवताच या कामाला प्रारंभ करण्यात आला.
राहुरी ते ताहाराबाद या रस्त्यासाठी १ कोटी ८५लाख रुपयाचा निधी मंजूर असून त्यातून या रस्त्याचे काम होणार आहे. शासनाने या कामास स्थगिती दिली नसती तर वाढलेल्या ८ टक्के जीएसटीचा फायदा झाला असता. रस्त्याच्या कामांना शासन एकदाच निधी देत असते. मिळालेल्या निधीचा योग्य तो वापर करून रस्त्याची कामे दर्जेदार करावी. असे सांगून राहुरी ते ताहाराबाद म्हैसगाव पर्यंतच्या रस्त्याचे काम मार्गी लावल्याचे आमदार तनपुरे यांनी यावेळी सांगितले.
याशिवाय राहुरी ताहाराबाद रस्त्यावरील अंतिम टप्प्यातील काम अतिशय निकृष्ट झालेले असून त्या कामाची चौकशी केली जाईल, तसेच काही ठिकाणी काम सोडून दिले आहे व पुढे काम केलेले दिसते असे का असा प्रश्न तनपुरे यांनी उपस्थित केला. शासन तर प्रत्येक किलोमीटर साठी पैसे देत असताना अर्धवट काम सोडण्याचा काय प्रकार आहे? असे त्यांनी विचारले. ठेकेदारांनी काम दर्जेदार करावे असे आवाहनही केले.
(Edited by-Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.