Ex. MLA Deepika Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCPNews; भाजपा व शिंदेंचे सरकार बागलाणला पाणी का देत नाही?

बागलाणला शेती सिंचनाला पाणी देण्यासाठी नार-पार योजनेत समावेश करण्याची माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मागणी.

Sampat Devgire

सटाणा : नार-पार, (Nar-Par water ccheme) अंबिका, औरंगा या पश्चिम वाहिनी नद्यांच्या पाणी (Water) वळण योजनेत बागलाण (Baglan) तालुक्याचा समावेश करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्य दीपिका चव्हाण (Deepika Chavan) यांनी दिला आहे. (State Government shall avail drinking & Irrigation water for Baglan Taluka)

सटाणा शहर आणि बागलाण तालुक्यातील पाण्याचे राजकारण पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. मतदारसंघात भाजपचे आमदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्याकडून सातत्याने भाजप आमदारांना लक्ष्य केले जात आहे. तालुक्याच्या दृष्टीने गुजरातला जाणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून शेतीला मिळावे अशी मागणी होत आहे.

नार - पार सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रस्तावात तालुक्याचा समावेश करून घेण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. मात्र अकार्यक्षम व दिशाहीन नेतृत्व यास जबाबदार आहे. राज्यात भाजपा व शिंदे गटाचे सरकार असूनही या वळण योजनांचे पाणी बागलाण तालुक्यातील शेती सिंचनाला उपलब्ध होऊ शकत नसल्याने हा तालुक्यावर अन्याय आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार तालुक्यात असताना ही वेळ आल्याने या अकार्यक्षमतेला बागलाणवासी कधीही माफ करणार नाही.

बागलाण तालुका हा कायम अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडतो. फक्त गेल्या वर्षात चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नसले तरी भविष्यकाळात तालुक्यातील शेती व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. नार-पार, अंबिका, औरंगा या पश्चिम वाहिनी नद्यांच्या वळण योजनांच्या माध्यमातून दहा टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. नार-पार, अंबिका, औरंगा या पश्चिम वाहिनी नद्यांचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्याच्या कामांचा डीपीआरमध्ये समावेश करण्याचे आश्वासन गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिले होते. मात्र ते न झाल्याने ही बागलाणकरांची चेष्टा केल्यासारखेच आहे. या योजनांमध्ये बागलाणचा समावेश न झाल्यास आगामी निवडणुकांमध्ये याची मोठी किंमत सत्ताधारी यांना मोजावी लागेल.

या गावांना होईल लाभ नार-पार-अंबिका-औरंगा या पश्चिम वहिनी नदी खोऱ्यातील पाणी चणकापूर धरणात टाकण्याचे प्रस्तावित आहे. या धरणातून डावा कालवा काढून बागलाण तालुक्यातील कायमस्वरूपी अवर्षणप्रवण व टंचाई ग्रस्त गावांना उपलब्ध झाल्यास पिंपळदर, दराणे, नवेगाव, तिळवण, जुने-नवे निरपुर, तरसाली वनोली, औदाणे, कौतिकपाडे, भाक्षी, मुळाणे, चौगाव, कऱ्हे, अजमेर सौंदाणे, सुराने, देवळाने, वायगाव, रातीर, रामतीर, सारदे, ब्राह्मणगाव, जुनी व नवी शेमळी, आराई, धांदरी या गिरणा व आरम नदी खोऱ्यातील गावांना त्याचा लाभ होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT