Satyajit Tambe News; सत्यजित तांबेंचा विजय, भाजपसाठी धडा!

या निवडणुकीनंतर काँग्रेसने जसं आत्मपरीक्षण करायला हवं, असे कार्यकर्ते बोलत आहेत.
Satyajit Tambe & Dr. Radhakrishna Vikhe Patil
Satyajit Tambe & Dr. Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष म्हणून नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघातून (Graduate constituency) निवडणूक लढवून ती जिंकली. या निवडणुकीनंतर काँग्रेसने (Congress) जसं आत्मपरीक्षण करायला हवं, तसं भाजपसाठीदेखील (BJP) ही निवडणूक एक धडाच आहे. सोशल मीडियासह (Social Media) अन्य निवडणूक साधनांचे योग्य नियोजन करून त्याचा वापर करणे तसेच अचूक निवडणूक व्यवस्थापन राबवत तांबे यांनी विजय मिळविला. (BJP shall take a lesson from this election for there bursting policy)

Satyajit Tambe & Dr. Radhakrishna Vikhe Patil
Pune Congress News : ...म्हणून कसब्यातील १६ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या; थोपटेंनी सांगितलं कारण

काँग्रेसला अशाच निवडणूक नियोजनाची गरज आहे. काँग्रेसमधील युवा पिढी या मार्गाने जाऊ पाहतेय. ज्येष्ठ काँग्रेसी नेते मात्र पारंपरिक पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना काही केल्या यश मिळत नाही. चांगले दणकट उमेदवार दूर सारून कमकुवत नेत्यांना जवळ करण्याचा आत्मघातकीपणाही काँग्रेसला दूर ठेवावा लागेल. कुठल्याही परिस्थितीत आपल्या हक्काच्या उमेदवाराने अपक्ष निवडणूक लढता कामा नये, याची दक्षता काँग्रेसश्रेष्ठींनी किमान यापुढे तरी घ्यायला हवी होती.

Satyajit Tambe & Dr. Radhakrishna Vikhe Patil
Congress News : सत्यजीत तांबेंना विधानसभा लढवायची होती, एबी फॉर्म योग्यच होता : काँग्रेसचा गौप्यस्फोट

राज्यभर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये भाजपला अपयश आले आहे. राज्यातील सुशिक्षित मतदार भाजपपासून दूर जात असल्याचे यानिमित्तानं प्रकर्षानं दिसून येतं. सत्यजित तांबे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली नसती, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. वस्तुस्थिती अशी, की भाजपला तांबे यांच्याविरुद्ध सक्षम उमेदवार शोधूनदेखील मिळाला नाही. वरकरणी भाजपची सत्यजित यांना मदत झाली, असं भासत असलं तरीदेखील भाजपने पुरस्कृत केलेला उमेदवार निवडून येण्याची कुठलीही खात्री नाशिक पदवीधर मतदारसंघात नव्हती. त्यामुळे भाजपने तटस्थ राहून आम्हीच या निवडणुकीतील कर्तेकरविते आहोत, असा आभास तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही नवख्या उमेदवार शुभांगी पाटील यांना ३९ हजार मते महाविकास आघाडीकडून लढताना मिळाली, हे दुर्लक्षून चालणार नाही. पदवीधर मतदारसंघातील ही ३९ हजार मते म्हणजे भाजपविरुद्ध अंडरकरंट अधोरेखित करणारी आहेत. तसेच या निवडणुकीमुळे धुळे-नंदुरबार, जळगावमध्ये शुभांगी पाटील यांचा बेस तयार झाला आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सत्यजित तांबे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. हे आवाहन करताना भूमिपुत्राला निवडून द्या, असं म्हटल्यानं नगरवगळता खानदेश आणि नाशिकमध्ये त्याचे नकारात्मक परिणाम उमटले. एक प्रकारे अन्य जिल्ह्यांतून तांबे यांना कमी मतदान होण्याची ही तजवीज होती का, अशीदेखील शंका येते. या अंगाने राजकीय धांडोळा घेण्याचा प्रयत्न सध्या विश्लेषक करत आहेत. भाजपमध्ये विखे-पाटील यांचा दबदबा वाढत आहे. केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नगरमध्ये झालेली राज्य सहकार परिषद त्याचेच द्योतक मानले जाते. त्यामुळे पारंपरिक प्रतिस्पर्धी यानिमित्तानं झुंजवण्याचे प्रयत्न पक्षांतर्गत रणनीतीचा भाग असल्याचीही चर्चा यानिमित्तानं होताना दिसून येते. सुजय विखे-पाटील हे युवानेतृत्व भाजपत वेगाने पुढे येऊ पाहत आहे. हादेखील या निवडणुकीच्या निमित्तानं होणाऱ्या चर्चेतील एक महत्त्वाचा कंगोरा मानला जातोय.

सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी करण्यामागची काय काय कारणं असू शकतात, यावर पुढेही चर्चा होत राहील. सत्यजित वरवर शांत-सुस्वभावी वाटत असले तरी देखील राजकारणातील त्यांची पुढील रणनीती थेट पण आक्रमक असेल, हे सत्यजित यांना जवळून ओळखणारे जाणून आहेत. त्यामुळे त्यांच्या खेळी आणि भेटीगाठींकडे राज्याचे लक्ष यापुढच्या काळात निश्चितपणाने असेल.

आणखी एका महत्त्वाच्या मुद्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, ते म्हणजे पदवीधर मतदारांची १२ हजार मते बाद कशी होऊ शकतात, हा कुठला संकेत आहे? पदवीधर मंडळी पसंतीक्रम देताना एवढ्या चुका नक्कीच करू शकत नाहीत. मतदार निवडणुकीला नाकारत आहेत का? पहिला पसंतीक्रम द्यायचा नसेल, तर दुसरा देऊ शकत होते. की या उमेदवारांना मतदान करायचं नव्हतं? निषेधदेखील नोंदवायचा होता? हे त्या मागचं एक कारण आहे का, याचीदेखील पडताळणी करून पाहावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com