Mayor Satish Kulkarni Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

स्वपक्षाच्या बाणांनींच सत्ताधारी भाजप रोज होतोय घायाळ?

प्रशासनावर वचक नसल्याच्या आरोपात आता जगदीश पाटील यांची भर पडली आहे. प्रशासन विरोधात भूमिका मांडणारे चौथे नगरसेवक ठरले आहे.

Sampat Devgire

नाशिक : साथीच्या आजारांवरून भाजप (BJP) आमदार प्रा. देवयानी फरांदे, (Devyani Pharande) विद्युत विभागावरून नगरसेवक मुकेश शहाणे, (Mukesh Shahane) तर महिला व बालकल्याण (Women and child welfare) समितीकडून महिला प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात नसल्याने सत्ता (Rulling party BJP) असूनही प्रशासनावर वचक नसल्याच्या आरोपात आता जगदीश पाटील यांची भर पडली आहे. प्रशासन विरोधात भूमिका मांडणारे चौथे नगरसेवक ठरले आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक ४ मधील टीडीआर (TDR Scam) घोटाळ्याप्रकरणी महासभेच्या ठराव होवूनही प्रशासनाने तो ठराव दाबून ठेवल्याने घोटाळा बाहेर येत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ४ मधील सर्वे क्रमांक १५९ (पै.) मध्ये आरक्षण क्रमांक ११२ वरील मैदानाची आरक्षित जागा संपादन करताना या भूखंडावर बांधीव शेड व अतिक्रमण असतानाही भूखंड ताब्यात घेतला गेला. भूखंडावरील अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम महापालिकेच्या खर्चाने हटविताना भरपाई महापालिकेने वसूल केली नाही. कमी क्षेत्राची खरेदी करून टीडीआर मात्र पूर्ण भूखंडावर दिला गेला. त्या शिवाय जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर मालक सदरी महापालिकेचे नावदेखील लावले गेले नाही, असा आरोप करीत नगरसेवक पाटील यांनी सोमवारच्या महासभेत महासभेचा अवमान झाल्याने हक्कभंगाचा प्रस्ताव सभागृहात दाखल करण्याची भूमिका मांडली. मिळकत विभागाच्या एका अभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये ठराव पडून असल्याचे जगदीश पाटील यांनी निर्दशनास आणून देताना संबंधितांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

अपयशाचे खापर प्रशासनावर

महापालिकेत भाजपची सत्ता असतानादेखील प्रशासनावर अंकुश नसल्याचे वांरवार समोर येत आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी डेंगी व चिकूनगुनिया आजाराचे रुग्ण वाढत आहे. औषध फवारणी होत नसल्याने आरोग्य विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. नगरसेवक मुकेश शहाणे यांनी माहिती मिळत नसल्याने विद्युत विभागाला टाळे ठोकले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती भामरे यांनी महिला प्रशिक्षणाचा ठेका मंजूर होत नसल्याने पुढील महासभेत उपोषणाचा इशारा दिला आहे. आता त्यात जगदीश पाटील यांची भर पडली असून, महासभेचा ठराव होवूनही टीडीआर घोटाळ्याची चौकशी होत नसल्याने प्रशासनावर तोंडसुख घेतल्याने सत्ता असूनही प्रशासनावर वचक नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT