राज ठाकरेंचा नाशिक प्रवास खडतर ...!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी सिडको मार्गाने अंबड लिंक रोडवर एका कार्यक्रमासाठी शहरात दाखल झाले.
Raj Thakre
Raj ThakreSarkarnama
Published on
Updated on

सिडको : नाशिक (Nashik Municiple corporation) महापालिका निवडणुकीच्या (Elections) पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakre) गुरुवारी (ता.२३) सिडको मार्गाने अंबड लिंक रोडवर एका कार्यक्रमासाठी शहरात दाखल झाले. परंतु, ते ज्या वाटेने आले, त्या वाटेत अनेक काटे (His way is not easy) असल्याने त्यांच्यासाठी सिडकोचा (Cidco) हा प्रवास खडतर असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. तशा प्रकारची चर्चादेखील सध्या चर्चिली जात आहे.

Raj Thakre
गुजरातच्या हॉटलाइनमुळेच अमरिशभाई पटेल भाजपवासी झाले!

तसे बघितले तर सिडको व अंबड हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच बालेकिल्ल्यातून शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना मागील दोन लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीत सातत्याने सर्वाधिक मते मिळाली आहेत. नाशिक पश्‍चिममध्ये शिवसेना- भाजप युतीचे विधानसभा उमेदवार सीमा हिरे या आमदार म्हणून निवडून आल्या. याच परिसरात सर्वाधिक नगरसेवक सध्या तरी शिवसेनेचे असून, नगरसेविका सुवर्ण मटाले या मनपा सिडको प्रभाग सभापती म्हणून कार्यरत आहेत. शिवसेनेचे १५, भाजपचे ८ व राष्ट्रवादी काँग्रेसचा नावाला केवळ एकच नगरसेवक आहे. तर माकप, काँग्रेस व मनसेला मात्र येथे साधा भोपळाही फोडता आला नाही. हे त्या पक्षांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. त्यातच भरीस-भर म्हणजे शिवसेना पक्षाने नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना महानगरप्रमुख हे पद बहाल केल्याने सिडको म्हणजे सध्या शिवसेनेकरिता सत्तेचे केंद्रबिंदू बनू पाहत आहे. नारायण राणे यांच्या विरोधात श्री. बडगुजर यांनी राज्यात पहिला गुन्हा नाशिकमध्ये दाखल केला, तर भाजप कार्यालयावर युवा सेना जिल्हाधिकारी दीपक दातीर यांनी हल्ला केल्याने सध्या ते जोरदार चर्चेत आहेत.

एकेकाळचे राज ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले अनिल मटाले सध्या तरी भाजपवासीय आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे, माजी आमदार निर्मला गावित, माजी आमदार नितीन भोसले, माजी महापौर विनायक पांडे, छत्रपती घराण्यातील स्नुषा सोनाली राजे पवार आदींचा रहिवास याच सिडको भागात आहे. आता हे सर्व नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲक्टिव्ह झाले आहेत.

Raj Thakre
नाशिकच्या महापौरांवर भाजपच्या नेत्यांचा विश्वास नाय का!

रस्तावर खड्डे

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी सिडकोमार्गे अंबड परिसरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. परंतु, ते ज्या मार्गाने येत आहेत, त्या मार्गावर सध्या उड्डाणपुलासाठी माती परीक्षण काम सुरू असल्याने रस्त्यावर खड्डे पडलेले आहे. तर माऊली लॉन्स ते प्रणव स्टॅम्पिंग दरम्यान झाडे तोडून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने श्री. ठाकरे यांचा हा प्रवास खड्डेमय मार्गाने खडतर पद्धतीने होणार असल्याचे चित्र सध्या तरी बघायला मिळत आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com