Chandrakant Raghuwanshi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मोठ्या थकबाकीदारांची यादी शहराच्या चौकात लावणार!

माजी आमदार रघुवंशी यांनी कर न भरणाऱ्यांबाबत सुचवली उपाययोजना

Sampat Devgire

नंदुरबार : आढावा बैठकीत (Nandurbar) केवळ १५ टक्के करवसुली झाल्याचे स्पष्ट झाल्याने हे अत्यंत वाईट आहे. पालिका आर्थिक अडचणीत असताना नागरिकांनी आपल्या करांची रक्कम भरून (Tax payments) पालिकेस सहकार्य करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा थकबाकीदारांची यादी शहराच्या चौकात लावण्याचा विचार करू, असे माजी आमदार तथा शिवसेना (Shivsena) नेते चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांनी दिली.

नंदुरबार शहरातील कर संकलानाबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार रघुवंशी म्हणाले, शहरातील अनेकांची कराची थकीत रक्कम मोठी आहे, तरीही ते भरत नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव पालिकेला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. लवकरच मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची यादी चौकात लावावी लागणार. कर न भरणाऱ्या नागरिकांची नळजोडणी १ मार्चपासून खंडित करण्याची मोहीम राबविणार असल्याची माहिती माजी त्यांनी दिली.

श्री. रघुवंशी म्हणाले, की नंदुरबारमध्ये दोन स्मशानभूमी आहेत. त्यातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी पालिकेने कोरोनाकाळात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार केले होते. आता पालिकेकडून या स्मशानभूमीचे नूतनीकरण होणार आहे. त्यासाठी डीपीडीसीकडे निधीची मागणी केली होती. पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी मागणी मंजूर केली आहे. फाइल तयार आहे. लवकरच निधी पालिकेस मिळणार आहे. त्यात स्मशानभूमीसाठी ९१ लाख रुपये मिळणार आहेत. तर मटण व मच्छी मार्केटच्या नूतनीकरणासाठी ९६ लाख रुपये मंजूर केले आहेत.

यंदा नागरिकांनी मालमत्ता कर भरण्याबाबत उदासीनता दाखविली आहे. त्यामुळे कर भरणा अगदीच कमी झाला आहे. नागरिकांनी कर भरावा, यासाठी थेट कारवाई सुरू करणार आहे. जे नागरिक कर भरणार नाहीत त्यांची नळजोडणी १ मार्चपासून खंडित होणार आहे. मोठ्या थकबाकीदारांची नावे शहरातील मुख्य चौकात होर्डिंग लावून जाहीर केले जाणार आहेत. त्यासाठी पालिकेच्या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना महिनाभर आता करवसुलीचेच कामाबाबत सूचित केले आहे.

एक दिवसाआड पाणी देणार

श्री. रघुवंशी म्हणाले, की शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक प्रकल्पात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याची बचत झाली आहे. मात्र मार्चपासून उन्हाची तीव्रता वाढते, पाणी जास्त लागते. म्हणून आपण मार्चपासून दोन दिवसांऐवजी एक दिवसाआड पाणीपुरवठा करू, असे आश्वासन दिल्याप्रमाणे १ मार्चपासून एक दिवसाआड पाणी दिले जाईल. मात्र आता सोडण्यात येणारे एक तासाऐवजी वेळ कमी करून ४५ मिनिटे पाणीपुरवठा केला जाईल. सहा महिने पाणीसाठा पुरवायचा असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT