मुख्यमंत्री, शरद पवारांसह सर्व भक्कमपणे नवाब मलिकांच्या पाठिशी!

येवला येथे पालकमंत्री छगन भुजबळांशी प्रवेशाप्रसंगी चर्चा करतांना मुस्लिम समाजाचे पदाधिकारी.
Chhagan Bhujbal welcomes workers joining NCP in Yeola
Chhagan Bhujbal welcomes workers joining NCP in YeolaSarkarnama
Published on
Updated on

येवला : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab mallik) यांच्या पाठिशी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) भक्कमपणे उभी असून शिवसेनेचाही सहभाग आमच्या सोबत आहे, असे स्पष्टीकरण पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिले.

Chhagan Bhujbal welcomes workers joining NCP in Yeola
गिरीश महाजनांची व्यूहरचना शिवसेनेची मुसंडी रोखू शकेल?

श्री. भुजबळ आज मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. भुजबळ संपर्क कार्यालयात त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. समस्या जाणून घेतल्या. पत्रकारांनी महाविकास आघाडीत शिवसेना असतांना मलिक यांना पाठिंबा देण्यासाठी होणाऱ्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच सहभागी होत आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी कुठेच दिसत नाही असा प्रश्न भुजबळांना केला.

Chhagan Bhujbal welcomes workers joining NCP in Yeola
वनपट्ट्यांसाठी रणरणत्या उन्हात शिरपूर ते धुळे लाँग मार्चला सुरवात

यावेळी भुजबळ यांनी महाविकास आघाडी राज्यात भक्कमपणे मंत्री मलिक यांच्याशी पाठिशी असून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीने ईडीकडून कारवाया केल्या जात आहे. या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या घटक पक्षातील नेत्यांनी राज्यभरात निदर्शने व आंदोलने सुरू केली आहेत. महाविकास आघाडीच्या कुठल्याही आंदोलनामध्ये शिवसेनेचा सहभाग हा असतोच असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मुंबईत आंदोलन झाले त्यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नेते संजय राऊत यांच्यासह काही मंत्री प्रचारासाठी उत्तर प्रदेशला होते तसेच कोकणातील यात्रेनिमित्त अनेक पदाधिकारी व आमदारही तिकडे गेलेले होते. अनेक ठिकाणी शिवसेनेची उपस्थिती लक्षणीय होती, त्यामुळे असे म्हणणे चुकीचे आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या पाठिशी उभा राहण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार व काँग्रेसच्या नेत्यांनी मिळून घेतला. यामुळे महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध भक्कमपणे उभी आहे असे देखील पालकमंत्री भुजबळांनी स्पष्ट केले.

भुजबळाच्या उपस्थितीत शेख यांचा प्रवेश

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळते अपक्ष नगरसेवक अमजद शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज येथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अपक्ष नगरसेवक अमजद शेख यांच्यासह मुसा शेख, वसीम शेख, फय्याज शेख, मोइनोद्दीन हाजी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, नगरसेवक दीपक लोणारी, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, अकबर शाह, मुश्रीफ शाह, भूषण लाघवे, सचिन सोनवणे आदी उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com