Satyajeet Tambe & Dr. Radhakrishna Vikhe-Patil
Satyajeet Tambe & Dr. Radhakrishna Vikhe-Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Satyajeet Tambe; विखे-पाटील यांना सत्यजीत तांबे आमदार झालेले चालतील का?

Sampat Devgire

नाशिक : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एक लाख २९ हजार मतदारांनी मतदान केले. यातील जवळपास निम्मे मतदान तीव्र राजकीय गटबाजी असलेल्या नगर (Nagar) जिल्ह्यातील आहे. येथे महसूलमंत्री (Revenue Minister) डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील (Dr. Radhakrishna Vikhe-Patil) आणि काँग्रेसचे (Congress) नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील राजकीय सख्य सर्वज्ञात आहे. या स्थितीत सत्यजीत तांबे आमदार झालेले विखेंना चालेल का? याची चर्चा जोरात आहे. (Indipendent Satyajeet Tambe is a rival of Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil)

नाशिक पदवीधर विभाग मतदारसंघात पाच जिल्ह्यांचा समावेष आहे. त्यात यंदा सर्वाधीत (४४ टक्के) १ लाख १५ हजार ६३८ मतदारांची नोंदणी आणि एकुण मतादानातील सर्वाधीक (५८ टक्के) ५८ हजार २८३ मतदारांनी मतदान नगरच्या मतदारांनी केले. एकुण मतदानाचा विचार करता नगरच्या मतदारांचा प्रभाव निकालावर असेल.

निवडणुकीत सरासरी ४९.२८ टक्के मतदान झाले. यामध्ये नंदुरबार- ९,३८५ (४९.६१ टक्के), धुळे- ११,८२२ (५०.५०), जळगाव- १८,०३३ (५१.४४), नाशिक ३१,९३३ (४५.८५) आणि नगरला ५८,२८३ (५०.४०) असे १ लाख २९ हजार ४५६ (४९.२८ टक्के) मतदान झाले. मतदानाची संख्या विचारात घेता नगरच्या मतदारांच्या हातील निवडणुकीचा कल आहे हे स्पष्ट होते.

नगर जिल्ह्यातील राजकारण भागनिहाय बदलत जाते. प्रत्येक भागात एक नेता व त्याचा विरोधाक यांच्यात राजकारण फिरत राहते. त्यात राजकीय पक्ष आणि विचारसरणीचा फारसा प्रभाव नसतो. या गटाच्या राजकारणात महसूलमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात गेली अनेक वर्षे राजकीय वर्चस्वाची लढाई चालत आली आहे. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, सहकार आणि राज्याच्या राजकारणातही त्यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष असतो. विखे पाटील सध्या भारतीय जनता पक्षात आहेत. या पक्षाने राजकीय डावपेचाचा भाग म्हणून या निवडणुकीत उमेदवार दिलेला नाही. अशा स्थितीत विखे पाटील अपक्ष उमेदवार तांबे यांना मतदान होईल, असे धोरण स्विकारतील का हा गंभीर प्रश्न आहे.

श्री थोरात यांचा संगमनेर आणि विखे-पाटील यांचा शिर्डी हे दोन्ही मतदारसंघ शेजारी आहेत. शिर्डी मतदारसंघातील चार जिल्हा परिषद गट संगमनेर तालुक्यातील आहेत. या चार जिल्हा परिषद गटांवरील वर्चस्व राखण्यासाठी दोन्ही नेत्यांत प्रचंड कुरघोडीचे राजकारण केले जाते. त्यात अगदी गावपातळीवर देखील कोणी नवीन कार्यकर्ता पुढे येत असेल तर ते सहन केले जात नाही.

यापूर्वी दोन्ही नेते काँग्रेस पक्षात असताना शालीनीताई विखे पाटील अध्यक्ष तर सत्यजीत तांबे उपाध्यक्ष होते. यावेळी आश्वासन देऊन देखील तांबे यांच्या अध्यक्षपदाच्या मार्गात विखे-पाटील यांनी राजकीय अडथळे आणत त्यांना पदापासून दूर ठेवले होते. अशा स्थितीत भाजपचे धोरण, तांबे यांची अपक्ष उमेदवारी व अन्य चर्चा काहीही असल्या तरीही सत्यजीत तांबे हे आमदार झालेले विखे पाटील यांना चालतील का? हा मतदारांत चर्चेचा विषय आहे. त्याचे उत्तर होय असेल तर तांबे यांचा मार्ग सोपा, नाही असेल तर `नगर`चे मतदार पदवीधरचा आमदार कोण? हे ठरवतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT