Dr Satish Patil with Avinash Adik
Dr Satish Patil with Avinash Adik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

पराभव झाला नसता तर डॉ. सतीश पाटील आज मंत्री असते!

Sampat Devgire

पारोळा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local self Government) निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी अधिकाधिक संघटनकौशल्य वाढवून जनतेला सहभागी करावे. डॉ. सतीश पाटील (Dr Satish Patil) यांचे पक्ष संघटनकौशल्य अभिनंदनीय आहे. विधानसभेत त्यांचा पराभव झाला नसता, तर ते आज मंत्री राहिले असते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश अदिक (Avinash Adik) म्हणाले.

पारोळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आदिक म्हणाले, पक्ष डॉ. पाटील यांच्या पाठीशी असून, त्यांनी खानदेशचे नेतृत्व करावे. डॉ. पाटील यांचा स्वबळाचा नारा राष्ट्रवादीला बळ देणारा असेल.

तालुक्याच्या आढावा बैठकीत इंधवे येथील सरपंच जितेंद्र पाटील व महाळपूर येथील सरपंच सुधाकर पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून यापुढे आता डॉ. सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली घड्याळाला साथ देऊ, असे जाहीर केले. या वेळी दोन्ही सरपंचांचा पक्षप्रवेश करण्यात आला. तालुकाध्यक्ष यशवंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्ता हीच माझी ताकद असून, मतदारसंघात ‘वन बूथ टेन यूथ’ हे अभियान राबवून गावपातळीवर राष्ट्रवादीचा झंझावात हा सुरू ठेवणार असल्याचे ते म्हणाले. ग्रामपंचायतींना २५-१५ योजनेतून निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले. या वेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पदाधिकाऱ्यांनी रेशनकार्ड, ई-श्रम कार्ड नोंदणी अभियान राबवून संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले.

या वेळी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, प्रदेश चिटणीस इजाज मलिक, अशोक लाडवंजारी, ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले, अरविंद मानकरी, रिता बाविस्कर, युवती जिल्हाध्यक्ष कोमल पाटील, पंचायत समिती माजी सभापती रेखा पाटील, माजी आमदार अरुण पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, सदस्य हिंमत पाटील, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT