Neelam Gorhe on CM Eknath Shinde : विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे महिला आणि बालकांच्या प्रश्नांवर संवेदनशील आहेत. आपल्या नाशिक दौऱ्यात त्या नियमितपणे विविध मंदिरांना भेटी देतात काल त्यांनी श्री काळाराम मंदिरास भेट दिली. या भेटीत त्यांनी एक वेगळा संकल्प केला आहे.
'यापूर्वी मी जे संकल्प केले होते ते सर्व पूर्ण झाले त्यामुळे आज काळाराम मंदिरात आरती व प्रार्थना करून कृतज्ञता व्यक्त केली आहे यानिमित्ताने काही नवे संकल्प देखील केले आहेत. आजवर मी मंदिरात ज्या ज्या इच्छा व्यक्त केल्या त्या पूर्ण झाल्याने काळाराम मंदिरात आल्यावर मला अतिशय प्रसन्न व मोकळे वाटते त्यामुळेच मी या मंदिराला भेट देत असते,' असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
सभापती नीलम गोऱ्हे यांनी भाविक म्हणून देखील एक नवीन संकल्प केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत श्रीराम मंदिर बांधले. हा विषय घरोघर पोचवला. त्यामुळे ते पुन्हा पंतप्रधान व्हावेत. राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारे सरकार चालले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री (CM) व्हावेत आणि त्यांच्या सरकारला नव्याने जनादेश मिळावा, हा संकल्प त्यांनी घेतला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा विद्यार्थ्यांनी महिला सुरक्षेचे प्रश्न अजूनही गंभीर आहेत. त्याबाबत लक्षणीय असे काम झाले, असे म्हणता येत नाही. त्यांच्याबद्दल अद्यापही राम राज्यासारखा बदल झालेला नाही. असे बदल करण्याची इच्छाशक्ती पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये आहे. हा एक दिलासा वाटतो, असे सभापती म्हणाल्या.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि नाशिक मधील श्री काळाराम मंदिर यांचे नाते अधिक दृढ झाले आहे. न्यायालयाच्या माध्यमातून अयोध्येतील श्री राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. मंदिर प्रत्यक्षात तयार झाले. याचा नक्कीच सर्वच राम भक्तांना आनंद आहे. आगामी काळात त्यातून एक आदर्श सांस्कृतिक व सामाजिक संदेश जाईल, असा विश्वास देखील गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.