MLC Dr Sudhir Tambe
MLC Dr Sudhir Tambe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

निवृत्ती वेतनाचा प्रश्‍न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

Sampat Devgire

नाशिक : सध्या राजकीय अस्थिरता असली तरी प्रशासकीय स्तरावरील कामे मात्र करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. निवृत्ती वेतनाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. त्याचा सतत पाठपुरावा कीरत आहे. हा प्रश्न सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी सांगितले. (MLC Dr. Sudhir Tmabe assured Retired employees)

नाशिक जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनतर्फे निवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा गंजमाळ येथील रोटरी क्लब सभागृहात झाला. यावेळी ते बोलत होते.

श्री. तांबे म्हणाले, की निवृत्तीनंतर वाढते वयाबरोबर अनेक अडचणी येतात. त्यामुळे महिन्याच्या १ तारखेस निवृत्ती वेतन मिळणे आवश्यक आहे. निवृत्ती वेतन धारकांच्या अडीअडचणी समस्या संघटनेकडून सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. सदस्यांकडून मात्र संकट समयी संघटनेची आठवण होत असते. असे न होऊ देता सर्वांनी संघटनेत एकत्र आले पाहिजे. संघटनेनेदेखील त्यांच्या मागण्यात लक्ष घालावे.

ते पुढे म्हणाले, सातवा वेतन आयोगाचा फरक, एक तारखेपर्यंत वेतन मिळावे, यासाठी प्रयत्न करावे. याशिवाय मेळाव्यात संघटनेचे पदाधिकारी निवृत्त कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या समस्या, तसेच ३० जून सुधारित वेतन, निवृत्ती वेतनाचा प्रश्न मार्गी काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवृत्त कर्मचाऱ्यांना वयाच्या मर्यादेनुसार विविध वैद्यकीय समस्या भेडसावत असतात. त्यासाठी एसएमबीटी रुग्णालयात उपचाराचा लाभ घ्यावा. सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत वैद्यकीय अडचणी सोडवण्याचा प्रयत्नही करण्यात येईल.

देशात दिव्यांग आणि वृद्धांची हवी तशी काळजी घेतली जात नाही. याची खंतदेखील त्यांनी या वेळी व्यक्त केली. असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत गायकवाड यांनी १ तारखेपर्यंत पेन्शन मिळावी, १ जानेवारी २०१६ चा दुसरा हप्ता मिळालेला नाही तो मिळावा. अडीअडचणी विधान परिषदेत मांडण्यात याव्यात, अशा मागण्या या वेळी केल्या.

यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार हळदे वित्त अधिकारी महेश बच्छाव, असोसिएशनचे सचिव आर. डी. सोनवणे, कार्याध्यक्ष रमाकांत अलई, दिलीप वारे, नामदेव सोनवणे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, प्रकाश तांबट आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT