मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे देखील नॅाट रिचेबल झाल्याने खळबळ उडाली आहे. ते आता बंडखोरांना गुवाहाटी येथे जाऊन सामील होणार की शिवसेनेतच राहणार याची उत्सुकता आहे. श्री. जाधव बंडखोर गटाला मिळाल्यास तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांना मोठा धक्का असेल. (If Bhaskar Jadhav joins Eknath Shinde it will big shock to Uddhav Thakre)
भाजप विरोधात आक्रमकपणे लढणारे भास्कर जाधव हेच फुटले तर शिवसेनेसाठी तो मोठा धक्का असेल. शिवसेनेचे एकुण ३७ आणदारांचे समर्थन एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. या शिवाय इतर आठ अपक्ष आमदार देखील त्यांच्या सोबत गुवाहाटी येथे आहेत. यात भास्कर जाधव सामील झाले तर शिवसेनेच्या एकुण आमदारांची संख्या अडतीसवर जाईल. (Bhaskar Jadhav News in Marathi)
दरम्यान `एएनआय` या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेचे आणखी तीन व पाच अपक्ष आमदार शिंदे यांच्या गटात सामिल होण्यासाठी काल रात्री सुरतला पोहोचणार होते. या तीन आमदारांत जाधव यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
इतर दोन आमदारांची नावे समजू शकली नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतरही त्यांना उद्या तब्बल आठ धक्के बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या गटात सध्या आमदार आहेत. हे तीन आमदार गेले तर ही संख्या १५ वर येईल.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.