येवला : केंद्र सरकारच्या (Centre Government) वतीने विणकरांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. विणकरांना स्वयंपूर्ण बनवणे हा यामागचा हेतू आहे. या योजनांचा विणकरांनी लाभ घ्यावा. येथील पैठणीचा (Yeola) विस्तार मोठा असून, जागतिक पातळीवर नाव आहे. यामुळे याठिकाणी टेक्स्टाइल इंडस्ट्रीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी केले.
येथील पैठणी विणकरांसाठी वस्त्र समिती, वस्त्र मंत्रालय, भारत सरकारतर्फे हँडलूम मार्क योजना आणि मोबाईल ॲपवरील क्लस्टर स्तरावरील जागरूकता कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्यान राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, येवला शहर पैठणीसाठी सर्वदुर प्रसिद्ध आहे. त्यामुळे या शहराच्या, परिसराच्या विकासाला हातभार लागला आहे. नावलौकीक वाढला आहे. त्याला अधिक सुस्थितीत व संघटीत स्वरुप दिले जाऊ शकते. त्यादृष्टीने टेक्सटाईल उद्योगाची योजना राबविण्याची प्रयत्न मी करेन. त्याचा निश्चितच सर्व विणकर व व्यावसायिकांना लाभ होईल.
येथील विणकरांचे कौतुक त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृती योजना, ज्येष्ठ विणकरांसाठी पेन्शन योजना तसेच हेल्थकेअर योजना आणि समस्या, प्रश्न, अडचणी केंद्रीय मंत्रालयामार्फत सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
वस्त्र समिती विभागाच्या के.सी.कौशल यांनी उपस्थित विणकराना हँडलूम मार्क योजना व ॲपविषयी माहिती दिली. यावेळी वस्त्र समिती विभागाचे सचिव ए. बी. चव्हाण, पैठणी उत्पादक शांतिलाल भांडगे, तहसीलदार प्रमोद हिले, माजी नगराध्यक्षा उषाताई शिंदे, रमेशसिंह परदेशी, भाजपचे शहराध्यक्ष तरंग गुजराथी, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडीया, मनोज दिवटे, मयूर मेघराज, संजय कुक्कर, राजु परदेशी, नाना लहरे, बापू गाडेकर, कुणाल भावसार आदी उपस्थित होते.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.