Rupali Chakankar with SP Sachin Patil
Rupali Chakankar with SP Sachin Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`स्वतः रुपाली चाकणकरांनीच केली नाशिकच्या कंट्रोल रूमला तक्रार`

Sampat Devgire

नाशिक : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Women commission president Rupali Chakankar) यांनी काल नाशिकच्या शहर व ग्रामीण पोलिसांच्या महिलांविषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. खरोखरच महिलांच्या तक्रारींची दखल घेतली जाते का? याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी स्वतः पोलिस कंट्रोल रूमला कॅाल केला. (She made a call on 1091 to police control room) पोलिसांनी त्याला प्रतिसाद देत तक्रारीची दखळ घेतली.

महिला आयोगाचे अध्यक्षपद सांभाळल्यानंतर त्या पहिल्यांदाच त्या नाशिकला आल्या होत्या. दिवसभर त्यांनी शहराच्या पोलिस आयुक्त तसेच ग्रामीण मुख्यालयातील पोलिस नियंत्रण कक्ष व महिला विभागाच्या कामकाजाची माहिती घेतली. दिवसभर महिल्यांच्या सुरक्षा, समस्या व सुविधांसाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथक, भरोसा सेल, दामिनी पथक, विशाखा पथक, भरारी पथक, बिट मार्शल अशा विविध उपक्रमांचा बारीक सारीक तपशील त्यांनी घेतला.

सौ. चाकणकर यांनी महिलांच्या सुरक्षा आणि त्यासाठी करण्यात येणारी उपाययोजना या संदर्भात पोलिस आयुक्त दीपक पांडे, पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी असलेल्या शहरी भागातील महिलांसाठी असलेल्या ११२ या हेल्पलाईनच्या पाहणीसाठी नियंत्रण कक्षाला भेट दिली.

पोलिसांकडे रोज येणाऱ्या तक्रारींच्या कॅालविषयी माहिती देखील त्यांनी घेतली. त्याचा अहवाल पोलिसांनी दिला. १०९१ हा क्रमांक नियं६ण कक्षात कार्यरत आहे का? त्यावर संपर्क साधल्यावर तात्काळ प्रतिसाद मिळतो का? याची चाचपणी करण्यासाठी त्यांनी स्वतः नियंत्रण कक्षाला कॅाल केला. त्याची तात्काळ दखल घेण्यात आली. त्याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. पोलिसांच्या कामाविषयी सौ. चाकणकर यांनी समाधान व्यक्त केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT