Dr Suvarna Vaje & Dr Sandip Vaje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

फारकतीचे ३० लाख टाळण्यासाठी डॅा संदीप वाजेने केली डॅाक्टर पत्नीची हत्या?

पोलिसांनी अटक केल्यावर संशयीत यशवंत म्हस्के मास्टरमाईंड असल्याचा संशय.

Sampat Devgire

नाशिक : महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे (Dr Suvarna Waje) जळीत हत्याकांडातील संशयित संदीप महादू वाजे यास बुधवारी न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा मावसभाऊ बाळासाहेब ऊर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के याला अटक केली.

गुरुवारी इगतपुरी न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पूर्वानुभव असलेला बाळासाहेब म्हस्के जळीत हत्याकांडाला अंतिम रूप देणाऱ्या संशयित संदीपचा मार्गदर्शक असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

डॉ. सुवर्णा वाजे जळीत हत्याकांडात त्यांचा पती संदीप वाजे याला न्यायालयीन कोठडी झाली आहे. चौदा दिवसांच्या दोन पोलिस कोठडीत पोलिस संशयित संदीप याच्याकडून फार काही मिळवू शकले नाहीत. अशी चर्चा असताना ग्रामीण पोलिसांनी बुधवारी त्याचा मावसभाऊ बाळासाहेब ऊर्फ यशवंत म्हस्के याला अटक केली. संदीप वाजे यांच्याप्रमाणेच म्हस्के यांच्यावर त्याने पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा असून त्यात त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली आहे.

वरीष्ठ न्यायालयात अपील करत तो न्यायालयातून जामिनावर बाहेर आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली संदीप याने डॉ. सुवर्णा वाजे जळीतकांडाला आकार दिल्‍याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिस निरीक्षक अनिल पवार, पोलिस नाईक पवार, मराठे, भावनाथ, काकड यांच्या पथकाने त्यांना गजाआड केले.

डिलिट रेकॉर्ड हस्तगत

संशयित संदीप वाजे याने स्वतःच्या व मृत सुवर्णा यांच्या मोबाईलमधील काही संदेश डिलिट केले होते. ते पुन्हा मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात बायकोला बायको म्हणून दूरच; पण माणूस म्हणूनही वागणूक मिळत नसल्याचे डॉ. सुवर्णा यांचे उल्लेख आहेत. तसेच फारकतीसाठी ३० लाख व जमिनीच्या वाट्यातील सुमारे अडीच कोटी रक्कम डॉ. सुवर्णा यांना द्यावी लागू नये म्हणूनही संदीप याने त्यांचा खून केल्याचा संशय असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

दुसरा संशयित यशवंत म्हस्के याच्यावरही पत्नीच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा आहे. त्याने संदीप वाजेला सहकार्य केले. दोघांचे जळीतकांडादरम्यान एकत्रित लोकेशन मिळाले आहे.

- सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT