नाशिक : महापालिका (NMC) निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांना जाग आली आहे. हे नेते दिवसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बैठका घेतात आणि रात्र होताच भाजप (BJP) प्रवेशासाठी आमच्या नेत्यांशी संपर्क करतात, असा चिमटा भाजपच्या आमदार सीमा हिरे (MLA Seema Hirey) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॅा अपूर्व हिरे (Dr. Apurva Hirey) यांचे नाव न घेता केली आहे.
सिडको येथे महापालिका निवडणुकीच्या आढाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत डॅा अपूर्व हिरे यांनी भाजपला लक्ष्य केले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतले होते. मात्र त्यानंतर या शहराचा काहीही विकास झाला नाही, अशी टिका त्यांनी केली होती. त्याबाबत भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
याविषयी आमदार हिरे म्हणाल्या, डॅा. हिरे यांनी अपूर्ण माहितीच्या आधारे प्रसिद्धीसाठी खोटे वक्तव्य करू नये. नाशिक महानगरपालिकेने गेल्या ५ वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खुप चांगली अशी विकास कामे केलेली आहेत. कोरोना काळात दोन वर्षे गायब असणाऱ्यांनी अपुर्ण माहितीच्या आधारे प्रसिद्धीसाठी खोटे वक्तव्य करू नये. दिवसा राष्ट्रवादीच्या बैठका करायच्या आणी रात्री भाजप प्रवेशासाठी आमच्या नेत्यांशी संपर्क साधायचा ही त्यांची कार्यपद्धती आहे. जनतेला हे सर्व माहिती असल्याने कोणीही त्यांना गांभिर्याने घेणार नाही. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस हा आत्मविश्वास हरवलेला पक्ष आहे. भाजपवर टिका करून त्या पक्षाच्या नेत्यांना काहीही हवा निर्माण करता येणार नाही.
आमदार हिरे म्हणाल्या, भारतीय जनता पक्षावा नाशिक महापालिकेत पहिल्यांदाच पुर्ण बहुमत मिळाले. ते या पक्षावर जनतेचा विश्वास आहे म्हणून मिळाले. गेल्या पाच वर्षात शहरात अनेक विकासकामे झाली आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून शहरासाठी अनेक योजना मंजूर केल्या. शहरात बससेवा सुरु झाली आहे. कोरोना काळात प्रशासन व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या. यावेळी विरोधी पक्ष व भाजपवर टिका करणारे राष्ट्रवादीचे नेते कुठे होते?. सध्या केवळ प्रसिद्धीसाठी अपूर्ण माहितीच्या आधारे त्यांची टिका होत आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.