Amol Jawale
Amol Jawale  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Yawal Bazar Samiti Election : यावलमध्ये माजी खासदार जावळेंच्या सुपुत्राची सहकारात एन्ट्री ; एकहाती सत्ता

सरकारनामा ब्यूरो

Yawal Bazar Samiti Election Amol Jawale : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात सहा पैकी तीन जागावर महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे, तर दोन जागा महायुतीच्या ताब्यात गेल्या आहेत. एका ठिकाणी त्रिंशकू परिस्थिती निर्माण झाली आहे.

यावल बाजार समितीमध्ये माजी खासदार स्व. हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीवाने एन्ट्री केली आहे. भारतीय जनता पक्षाने शिवसेना व रिपाइंला सोबत घेऊन सहकार पॅनलची निर्मिती केली होती. महायुतीच्या सहकार पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे. महायुतीच्या पॅनलने १८ पैकी तब्बल १५ जागांवर विजय संपादन करून एकहाती वर्चस्व संपादन केले.

हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांनी यावल बाजार समितीमध्ये 18 पैकी १५ जागा जिंकून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव केला. दिवंगत राजकीय नेत्याचा वारसदाराची वाटचाली आशादायक दिसत आहे. यावल बाजार समितीमध्ये अमोल जावळे यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केले आहे.

महाविकास आघाडीतर्फे आमदार शिरीषदादा चौधरी यांनी धुरा सांभाळली होती, तर भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार लताताई सोनवणे व अमोल हरीभाऊ जावळे यांनी पॅनलचे नेतृत्व केले होते.

कोण आहेत अमोल जावळे

मितभाषी संयमी व अभ्यासू कार्यकर्ता म्हणून अमोल जावळे हे परिचित आहेत. जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेमध्ये अमोल जावळे यांनी अतिशय संयमीपणाने आपल्या सूक्ष्म नियोजनाच्या आधारावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या एक हाती सत्तेला सुरुंग लावित दुध संघामध्ये भाजपच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

किशोर पाटीलानी गड राखला

भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे आमदार आमदार किशोर पाटील यांनी आपला गड राखला आहे. प्रचंड चुरस असलेल्या या निवडणुकीत अखेर आमदार किशोर पाटील यांनी बाजी मारली आहे. निवडणुकीपूर्वी येथे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यात जंगी सभा झाला होती.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT