Amalner Bazar Samiti Election : अमळनेरमध्ये सत्तांतर ; राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांकडून तीन माजी आमदारांना धोबीपछाड

Bazar Samiti Election 2023 : भाजपच्या तीन माजी आमदारांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.
NCP MLA Anil Patil
NCP MLA Anil PatilSarkarnama
Published on
Updated on

Amalner Bazar Samiti Election : जळगाव जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल लागले आहेत. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लागलेल्या निकालात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचाच बोलबाला दिसून आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलने ११ जागा पटकावल्या आहेत. दुसरीकडे तीन माजी आमदार यांच्या नेतृत्वाखालीअसलेल्या भाजपच्या पॅनलला धोबीपछाड मिळाली आहे.

NCP MLA Anil Patil
Bodwad Bazar Samiti Result : शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांना धक्का; खडसे गटाची मोठी आघाडी

याठिकाणी भाजपला माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. आमदार अनिल पाटील यांच्यासह, भाजपच्या तीन माजी आमदारांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रणीत पॅनलने दणदणीत विजय मिळावा आहे. पर्यायी आमदार चंद्रकांत पाटील यांना जोर का झटका बसला आहे.गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून आमदार एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून बाजार समिती ही भाजपकडे होती. मात्र आता ती खडसेंनी आपल्या जोरावर राष्ट्र्रवादीकडे आणली आहे. त्यांनी चंद्रकांत पाटलांचा दारुण पराभव केला आहे.

NCP MLA Anil Patil
Nandgaon Bajar Samiti Results : आमदार सुहास कांदेंनी १५ जागा जिंकल्या, आघाडीचा धुव्वा

जळगाव जिल्ह्यातील बाजार समितींचा निकाल

1) चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती

भाजप शिंदे गट – 9 महाविकास आघाडी – 4 अपक्ष – 5

2) भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती

भाजप शिंदे गट – 15 महाविकास आघाडी – 3

3) जामनेर कृषी उत्पन्न बाजार समिती

भाजप शिंदे गट – 18

4) चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

भाजप शिंदे गट – 13

महाविकास आघाडी – 5

5) रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती

महाविकास आघाडी – 13 भाजप शिंदे गट – 3 अपक्ष – 2

6) पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती

महाविकास आघाडी – 15 भाजप-शिंदे गट – 3

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com