Nashik Politics : येवला नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या विजयी तसेच निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत विजयी उमेदवारांनी मंत्री भुजबळ यांचे आशीर्वाद घेतले.
छगन भुजबळ आजारी असल्याने मुंबईतील निवासस्थानी डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती घेत आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीत सहभाग घेता आला नाही. मात्र तरीही त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हॉस्पिटलमधूनच येवलेकरांशी ऑनलाइन संवाद साधला होता. भुजबळांनी येवला नगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. समीर भुजबळ यांच्यासह संपूर्ण भुजबळ कुटुंब प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळाले होते.
अखेरीस भुजबळांना गड राखण्यात मोठे यश आले. दराडे बंधूंचे पुतणे रुपेश दराडे यांचा पराभव करुन भुजबळांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र लोणारी ११६५ मतांनी निवडून आले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रसचे ११ व भाजपचे ३ असे एकुण १४ उमेदवार युतीचे विजयी झाले. या सर्व विजयी उमेदवारांनी तसेच पराभूत उमेदवारांनी देखील मोठ्या साहेबांचे अर्थात छगन भुजबळ यांचे मुंबईत जाऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी, येवला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करावे. नगरपालिका ही लोकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असते. त्यामुळे पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असे मार्गदर्शन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी विजयी उमेदवारांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पराभूत उमेदवारांनी खचून न जाता पुन्हा आपले काम सुरु ठेवावे जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.
यावेळी येवला विधानसभा अध्यक्ष वंसत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, पप्पू सस्कर, राजेश भांडगे, शहराध्यक्ष दीपक लोणारी, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांच्यासह विजयी उमेदवार पदाधिकारी व कायकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
निवडणुकीत मिळालेला हा विजय म्हणजे येवलेकर जनतेचा विकासावरचा विश्वास आहे. त्यामुळे येवला शहरासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.