Yeola Election Result : भुजबळांनी हॉस्पिटलमधून गड राखला, राजेंद्र लोणारींचा दणदणीत विजय.. दराडे बंधूंना चारली धूळ..

NCP leader Rajendra Lonari wins : येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भुजबळांना शह देण्यासाठी दराडे बंधूंनी आव्हान उभे केले होते. माणिकराव शिंदेंना सोबत घेतले होते.
NCP leader Rajendra Lonari  wins
NCP leader Rajendra Lonari winsSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : येवला हा राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे येवला नगरपालिका निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर येवल्याचा गड भुजबळांनी राखला आहे. भुजबळांचे (राष्ट्रवादी-भाजप) युतीचे उमेदवार राजेंद्र लोणारी हे ११०० मतांनी विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रुपेश दराडे यांचा त्यांनी पराभव केला.

भुजबळ आजारी असल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यामुळे त्यांनी हॉस्पिटलमधूनच प्रचाराची रणनिती आखली होती. हॉस्पिटलमधूनच त्यांनी येवलेकरांना संबोधित केलं होतं. भुजबळ आजारी असल्याने निवडणुकीची सगळी धुरा समीर भुजबळांनी हाती घेतली होती. भुजबळ कुटुंबीय येवल्यात तळ ठोकून होते. संपूर्ण भुजबळ कुटुंबीय प्रचारात उतरले होते.

शिवसेनेच्या नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांनी भुजबळांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माणिकराव शिंदे यांना सोबत घेतलं होतं. आपला पुतण्या रुपेश दराडे यांना उमेदवारी दिली होती. पण भुजबळांना शह देण्यात दराडे बंधूंना अपयश आलं आहे. भुजबळांनी दराडे बंधूंना धुळ चारली आहे.

छगन भुजबळ आजारी होते. त्यामुळे विरोधकांनी समीर भुजबळांना घेरलं होतं. विकासाच्या दावे-प्रतिदाव्यांतून निवडणुकीला मोठी रंगत आली होती. रुपेश दराडे यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांचीही येवल्यात सभा झाली होती. एकनाथ शिंदे यांनी तर येवल्यात आजवर विकासच झाला नाही असा दावा केला होता. परंतु त्यानंतर हॉस्पिटलमधून भुजबळांनी येवलेकरांशी साधलेल्या संवादानंतर निवडणुकीचे गणितच पालटले.

छगन भुजबळ यांनी थेट हॉस्पिटलमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. त्यातूनच येवल्यात भाजपने राष्ट्रवादीला साथ दिली होती. त्यामुळे भुजबळांना भाजपचा मोठा आधार मिळाला. भाजप कुणाला साथ देते यावरच निवडणुकीचा कल ठरणार होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com