Chhagan Bhujbal, Narendra Darade, Kishore Darade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhujbal Vs Darade : येवल्यात पहिलवान घराण्यांची टक्कर ; भुजबळांचा उमेदवार की दराडे बंधूंचा, कोण कुस्ती जिंकणार?

Yeola Municipal Election : येवल्यात नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदावर रुपेश दराडे विरुद्ध राजेंद्र लोणारी अशी लढत होत असली तरी प्रत्यक्षात खरी लढत भुजबळ व दराडे बंधू अशी आहे.

Ganesh Sonawane

Yeola Politics : येवल्यातील लोणारी-दराडे कुटुंबात राजकीय हेव्यादाव्यातून मागील काही वर्षांत दरी निर्माण झाली होती. त्याचाच भाग म्हणून दोन्ही कुटुंबीय नगरपालिका निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकले आहेत.

राजकीय पटलावर येवल्याची निवडणूक ही निवडणूक मंत्री छगन भुजबळ विरुद्ध दराडे बंधू यांच्या राजकीय वर्चस्वाची मानली जातेय. नरेंद्र दराडे व किशोर दराडे हे दोन्ही भाऊ आता भुजबळांच्या विरोधात आहे. त्यामुळे दराडे बंधू दमदार उमेदवार देणार, हे जवळपास निश्चित होते. त्यांनी पुतण्या रुपेश दराडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे.

पण भुजबळ हे देखील काही कमी नाही. ते आजारी असले तरी त्यांनी समीर भुजबळांकडे येवल्याची धूरा सोपवली आहे. समीर भुजबळांनी दराडे बंधू तगडे आव्हान उभे करतील, हे हेरूनच नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र लोणारी यांचे नाव निश्चित केले. शिवाय दराडे बंधूंना टक्कर देण्यासाठी भाजपसोबत युती देखील घडवून आणली. येवल्यात भाजप व राष्ट्रवादीची युती व्हावी यासाठी स्वत: छगन भुजबळांनी थेट फडणवीसांकडे सेटींग लावली.

येवला शहरात शेकडो वर्षांच्या तालमींची परंपरा असून कै. धोंडीराम वस्ताद तालीम येथील नावाजलेली तालीम आहे. लोणारी व दराडे दोन्ही परिवारातील डजनभर पहिलवान याच तालमीत घडले. कुस्तीच्या आखाड्यात डाव-प्रतिडाव शिकविणारे हे कुटुंबीय आता राजकीय आखाड्यात एकमेकांच्या विरोधात कसे डाव टाकणार, हा संपूर्ण शहराच्या राजकीय पटलावर चर्चेचा आणि उत्सुकतेचादेखील विषय बनला आहे.

सध्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र लोणारी नावाजलेले पहिलवान असून थेट महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचले असून ते उपमहाराष्ट्र केसरी ठरले आहेत. तसेच रुपेश दराडे देखील काही कमी नाही, ते स्वत: पहिलवान नसले तरी कुस्तीचे सर्व डाव त्यांना परिचित आहे. माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, किशोर दराडे, नरेंद्र दराडे हे देखील याच तालमीचे पठ्ठे आहेत. त्यामुळे रुपेश दराडे यांचाही तालमीशी संबंध येतोच.

प्रत्यक्षात निवडणुकीच्या आखाड्यात कुणीही असो पण येवल्यात खरी लढाई दराडे बंधू व भुजबळ यांच्यातच होत आहे. दराडे बंधू व भुजबळांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. भुजबळ व दराडे बंधूंच्या वर्चस्वाची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. त्यामुळे कुणाचा उमेदवार ही मानाची कुस्ती जिंकतो हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT