Devendra Fadnavis, Chhagan Bhujbal, Amruta Pawar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : येवल्यावरून महायुतीत टेन्शन; भाजपच्या अमृता पवारांनी थोपटले दंड

Arvind Jadhav

Nashik Yeola Poltics News :

भाजपच्या अमृता पवार यांनी येवल्यातून लढण्याचा ठाम निर्धार केला असून, मंत्री छगन भुजबळांच्या अडचणींमध्ये यामुळे वाढ होऊ शकते. पक्षाने सांगितल्यापासून माझे मतदार संघात काम सुरू असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले. महायुतीत लोकसभेच्या जागावाटापावरून अद्याप धुसफूस सुरूच आहे. दुसरीकडे लोकसभेचे परिणाम विधानसभा मतदारसंघावर सुद्धा पडत असल्याचे चित्र आहे.

महायुतीच्या Lok Sabha Election च्या जागावाटपाचा फार्म्युला अद्याप समोर आलेला नसताना विधानसभेच्या जागांवरून इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. येवला मतदारसंघात सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अमृता पवार यांनी मागील वर्षी पक्ष प्रवेश केल्यापासून येवला मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

माजी खासदार डॉ. वसंतराव पवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या कन्या असलेल्या अमृता पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत. तसेच गोदावरी बँकेच्या अध्यक्षा असलेल्या पवार यांनी गत वर्षी राष्ट्रवादीची साथ सोडून Bjp मध्ये प्रवेश केला.

भाजप प्रवेशानंतर लागलीच त्यांनी आपले लक्ष येवला विधानसभा मतदारसंघाकडे वळवले. राजकीय समीकरणांना कलाटणी मिळाल्यानंतर राजकीय विरोधक असलेले भुजबळ आणि पवार एकाच गटात दाखल झाले. पवार यांनी देवगाव (ता. निफाड) गटातून जि.प. निवडणूक जिंकली होती. देवगाव गट हा येवल्यात येतो. त्यामुळे पवार विधानसभेसाठी निफाडकडे वळतील, अशी शक्यता सुरूवातीपासूनच नव्हती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मला पक्षाने सांगितले तेव्हांपासून मी येवला विधानसभा मतदारसंघात काम करते. विधानसभेला अद्याप वेळ असून मी येवल्यातूनच निवडणूक लढवणार. येवल्यात माझे काम सुरूच राहणार आहे. येथून माघार घेणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. पवार यांच्या या भूमिकेमुळे मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर आणखी एक आव्हान उभे राहणार आहे. मुळात मराठा विरूद्ध भुजबळ असे चित्र येवला मतदारसंघात उभे राहिले आहे.

छगन भुजबळांना रोखण्यासाठी महाआघाडी मैदानात उतरली आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार किशोर आणि नरेंद्र दराडे बंधू, शरद पवार गटाने भुजबळांविरोधात मजबूत मोट बांधली आहे. त्यातच छगन भुजबळांना आता महायुतीतून सुद्धा विरोधाला सामोरे जावे लागणार अशी शक्यता आहे.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT