Vasant Gite : मिसळ पार्टीतून वसंत गितेंची विधानसभेची तयारी; नाशिकच्या राजकारणात चाललंय तरी काय...

Shivsena Politics 'निवडणूक असो वा नसो माझी नेहमीच तयारी'
Nashik Leaders
Nashik LeadersSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते माजी आमदार वसंत गीते यांच्या मिसळ पार्टीला आज सर्व पक्ष नेत्यांची हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपण निवडणुकीसाठी सदैव तयारीत असल्याचे दाखवून दिले आहे. या मिसळ पार्टीने गीतेंनी आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी विरोधक भाजपला शह देतनाच मित्र पक्ष काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळवल्याची चर्चा आहे.

गीते (Nashik) नाशिक मध्य मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये ते भारतीय जनता पक्षात असल्याने त्यांची उमेदवारी हुकली होती. विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना भाजपने दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने गीते यांनी भविष्यातील राजकीय कल लक्षात घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांचा शिवसेना प्रवेश प्रामुख्याने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून पाहिला जात होता. त्या दृष्टीने आजची मिसळ पार्टी यशस्वी राजकीय चाल ठरली आहे.

Nashik Leaders
Manoj Jarange : मुंबईतील आंदोलनाबाबत मनोज जरांगेंची मोठी अट; दोन दिवसात काय होणार ?

माजी आमदार गीते (Vasant Gite) यांच्या मिसळ पार्टीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांसह अन्य पक्षांच्या नेत्यांनीही हजेरी लावली. विशेष म्हणजे गीते यांची सर्व पक्षातील नेत्यांची संपर्क आणि मैत्री आहे. त्यामुळे काही भाजपच्या नेत्यांनी देखील मिसळीची चव घेतली. मात्र या मिसळ पार्टीमध्ये महाविकास आघाडीतर्फे गीते यांची उमेदवारी असेल, असे संकेत देणाऱ्या प्रतिक्रिया खुद्द काँग्रेस पक्षातूनही व्यक्त झाल्या. त्यामुळे आजच्या मिसळ पार्टीतून एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा पसरली आहे.

Nashik Leaders
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली तर... : रोहित पवारांचा बारामतीतूनच एल्गार, म्हणाले...

गीते यांनी पार्टीतून नाशिक मध्य मतदार संघातून आपली उमेदवारी असल्याचे संकेत देत भाजप आणि महायुतीच्या पक्षांसह आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांना संदेश दिला आहे. त्याचबरोबर या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा दावा आहे. गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी येथून उमेदवारी केली होती. त्यांचा भाजपच्या देवयानी फरांदे यांनी पराभव केला.

त्यादृष्टीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एक प्रबळ दावा नाशिक मतदारसंघात केला आहे. गीते यांना उमेदवारी मिळाल्यास महाविकास आघाडी संघटितपणे त्यांच्यामागे उभी राहील, असे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी सांगितले. त्यामुळे एकाचवेळी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय संदेश देण्यात गीते यशस्वी झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आजच्या मिसळ पार्टीला काँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष आकाश छाजेड, गुरमीत बग्गा यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गोकुळ पिंगळे आणि अन्य नेत्यांनी देखील हजेरी लावली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड माजी महापौर विनायक पांडे, देवानंद बिरारी, मुशीर सय्यद, माकपचे तानाजी जायभावे यांसह पक्ष नेत्यांची हजेरी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बोलकी होती.

Nashik Leaders
Nana Patole : पुणे काँग्रेसमधील गटबाजी संपवण्यासाठी नाना पटोले सरसावले; घेतला मोठा निर्णय...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com