Swapnil Patil wins youth congress election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

रोहिदास दाजींचा वारसा... स्वप्नील पाटील चौथ्यांदा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी!

युवक काँग्रेसच्या निवडणुकांत सर्वच पदाधिकाऱ्यांनी ताकद चुरस.

Sampat Devgire

नाशिक : काँग्रेस (Congress) नेत्यांची नवी पिढी देखील राजकीय डावपेचांची शाळा असलेल्या युवक (Youth) काँग्रेसच्या संघटनेत चांगलीच तरबेज झाल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या युवक काँग्रेसच्या निवडणुकीत नाशिक शहर व जिल्ह्याच्या अध्यक्षपदी स्वप्नील पाटील (Swapnil Patil) यांची अतिशय चुरशीच्या निवडणुकीत चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली. (Swapnil Patil News Upadtes)

स्वप्नील पाटील नाशिक शहराच्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यांना धुळ्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास दाजी पाटील व आमदार कुणाल पाटील यांचा कुटुंबातील राजकीय वारसा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या युवक काँग्रेस निवडणुकीमध्ये यंदा महाराष्ट्रात अतिशय चुरस निर्माण झाली होती. अनेक युवकांनी यामध्ये प्रचार, उमेदवारी तसेच वातावरण निक्मितीत सहभाग घेतला. या चुरशीच्या निवडणुकीत स्वप्नील पाटील यांची सलग चोवथ्या नाशिक शहर (जिल्हा) अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी साडे आठ हजार मतांनी विजय मिळवला. प्रदेश सरचिटणीसपदी गौरव पांनगव्हाणे यांची निवड झाली. त्यांना अठ्ठावीस हजार मते मिळाली. (Nashik youth congress news)

या निवडणुकीत मध्य नाशिकच्या अध्यक्षपदी जयेश सोनवणे, पश्चिम नाशिकच्या अध्यक्षपदी देवेंद्र देशपांडे, पूर्व नाशिकच्या अध्यक्षपदी रोहन कातकडे, प्रदेश सचिवपदी आतिषा पैठणकर तसेच ग्रामीण युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी मानस पगार यांची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने आज काँग्रेस भवनमध्ये त्याचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, महापालिकेतील काँग्रेस गटनेते शाहू महाराज खैरे, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नगरसेवक समीर कांबळे, नगरसेवक वत्सलाताई खैरे, नगरसेवक राहुल दिवे, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती-जमाती विभागाचे सरचिटणीस सुरेश मारू, उध्दव पवार, किरण जाधव, विक्रांत वावरे, गौरव सोनार, प्रमोद धोंडगे, सुदेश(अण्णा)मोरे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT