CM Eknath Shinde & Shivani Wadettiwar
CM Eknath Shinde & Shivani Wadettiwar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

CM Eknath Shinde Birthday News : अशाही शुभेच्छा...मंत्रिमंडळात महिलांना स्थान द्या!

Sampat Devgire

Nashik News : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री (CM) झाल्यावर त्यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना समर्थक तसेच राजकीय (Politics) व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिला आहेत. यामध्ये युवक काँग्रेसच्या (Congress) नेत्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी शुभेच्छा देताना मुख्यमंत्री शिंदे यांना राजकीय चिमटा घेतला आहे. त्यामुळे त्या शुभेच्छा चर्चेचा विषय आहेत. (Congress leader Wadettiwar greets CM Eknath Shinde on His Birthday)

महाविकास आघाडी सरकारला खाली खेचून एकनाथ शिंदे व भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात सहा महिन्यापूर्वी सत्तेत आले. घाई गडबडीत झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान मिळालेले नाही.

यानिमित्ताने काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रीमंडळात नेमकी उणीव हेरत त्यांना राजकीय चिमटा घेतला आहे. या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार केव्हा होणार याबाबत सातत्याने वेगवेगळे मुहुर्त सांगितले जातात. सर्वोच्च न्यायालयात तसेच निवडणूक आयोगाकडे त्याबाबत सुनावणी सुरु आहे. शिवसेनेते फूट पाडून चाळीस आमदार व अपक्षांची मदत घेऊन एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवले. मात्र विरोधकांकडून अद्यापही हे या सरकारच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. अशा स्थितीत मंत्रीमंडळात महिलेला स्थान नाही, हा प्रश्न उपस्थित केला गेला.

वडेट्टीवार यांनी याबाबत ट्वीट करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्या म्हणतात, ``राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!. चला आजच्या दिवशी तरी संकल्प करून राज्याच्या मंत्रीमंडळात महिलांना प्रतिनिधीत्व द्या. जेणेकरून महिलांना त्यांचे प्रश्न, समस्या मांडणे आणि त्या सोडविणे अधिक सोयीचे होईल.``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT