Yuva sena agitaion at Jalgaon
Yuva sena agitaion at Jalgaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नरेंद्र मोदींनी महागाई वाढवून जनतेची चुल बंद केली!

Sampat Devgire

जळगाव : युवा सेनेतर्फे (Yuva sena) आज जळगाव (Jalgaon) शहरात महागाई (Inflation) वाढीचा निषेध करण्यात आला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या निषेधार्थ चौकात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी थाळी वाजवा आंदोलन केले. या सरकारने सर्वसामान्यांना जगणे मुश्कील केले आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांना सत्तेतून खेचावेच लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

युवा सेनेतर्फे आज राज्यभर कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक थाळी वाजवून मोदी सरकारचा निषेध केला. स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. इतर वस्तूंची महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे. त्याचा निषेध म्हणून शिवसेनेच्या युवा सेनेतर्फे राज्यात थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले.

जळगावात ही आज युवा सेनेतर्फे थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले.जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, किशोर भोसले,विराज कावडिया यांच्या नेतृतवाखाली हे आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.यावेळी युवा सेनेचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.

या संदर्भात युवा सेनेचे नेते म्हणाले, संघटनेचे प्रदेश सरचिटणीस वरून सरदेसाई आणि जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, किशोर भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आंदोलन केले. केंद्रातील मोदी सरकारने दिलेल्या कोणत्याही आस्वासनांची पूर्तता केली नाही. ही जी फसवणूक जनतेची झाली ती एक प्रकारे एप्रिल फूल आहे. त्यामुळे आम्ही देखील उपहास म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव केला आहे. या सरकारने जनतेची दिशाभूल केलेली आहे. त्यांच्या कृपेने प्रचंड महागाईचे अच्छे दिन आले आहेत. त्यासाठी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या सरकारने स्वयंपाकाच्या गॅसची योजना आनली. त्यात स्वयंपाकासाठी चुल बंद करू असे सांगण्यात आले. रॅाकेलमुक्त करू असे सांगितले. आज खरोखर लोकांना चुल बंद करून उपवास करम्याची वेळ आली आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दर एव्हढे वाढले आहेत की या महागाईने गृहिणी रडकुंडीला आले आहेत. त्यांचे दर एक हजाराच्या पुढे गेले आहेत. केंद्र सरकारचा अजेंडा होता महागाई दुर करू. आता खरोखर त्यांनी महागाईचा कळस गाठला आहे. त्यामुळे आगामी काळात या सरकारला त्यांची जागा दाखवावी लागेल, असा इशारा देण्यात आला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT