Yuvraj Sambhajiraje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahadevi Controversy; महादेवी-माधुरी हत्ती प्रकरणात कोल्हापूरला वेगळा नियम का?, युवराज संभाजीराजे संतप्त

Yuvraj Sambhaji Raje; Prince Sambhaji Raje was very angry over the Mahadevi elephant case-देशभरात हत्तीच्या उपद्रवाच्या अनेक घटना त्याबाबत कधी कोल्हापूर सारखी कारवाई झालेली नाही

Sampat Devgire

Yuvraj Sambhaji Raje News: महादेवी उर्फ माधुरी हत्तीन ही आता कोल्हापूरकरांचा भावनिक विषय बनला आहे. यावर माजी खासदार युवराज संभाजीराजे हे देखील चांगलेच संतप्त आहेत. त्यांनी याबाबत दिल्लीत आपली भूमिका मांडली.

कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीन पुन्हा परत कोल्हापूरला आणावी याबाबत नागरिकांनी मोठा दबाव निर्माण केला आहे. सर्वपक्षीय कोल्हापूर या प्रश्नावर एकत्र आलेले दिसले.ह त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील त्याची दखल घेणे भाग पडले.

या प्रश्नात युवराज संभाजीराजे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. नांदणी मठातील माधुरी हत्ती परस्पर यांच्या वनतारा जंगलात हलविण्यात आली होती. याबाबत युवराज म्हणाले, या प्रकरणात आम्ही अतिशय आक्रमक आहोत. प्रश्न सुटेपर्यंत मागे हटणार नाही. कोल्हापूरच्या नागरिकांची ती भावनाच आहे.

या प्रकरणात वन्यप्राणी प्रेमी संघटना आणि संबंधितांना महत्त्व देताना कोल्हापूरसाठी वेगळा न्याय का? केरळमध्ये अनेक हत्ती शेतांमध्ये तसेच जंगलात असा उपद्रव करीत असतात. देशाच्या अन्य भागात देखील अशा घटना नियमितपणे घडल्याचे पाहायला मिळते. येथे सरकारने एवढ्या उत्साहाने आणि पुढाकार घेऊन निर्णय अशा प्रकारच्या निर्णय घेतल्याचे कधी दिसले नाही. त्यामुळे कोल्हापूरसाठी घेतलेला वेगळा निर्णय आम्ही सहन करणार नाही.

या प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पाठोपाठ काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनीही आवाज त्यानंतर सबंध कोल्हापूरकर या प्रश्नावर एकत्र आलेले दिसले. या दबावामुळे राज्य सरकारलाही घाम फुटला. त्यामुळे आता या प्रश्नावर गंभीर राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.

यामध्ये कोल्हापूरची जनता आक्रमक झाल्याने महायुतीचे कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांनी त्याचा धसका घेतल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पुढाकार घेऊन वनतारा व्यवस्थापनाशी चर्चा झाल्याचे सांगितले आहे. वनतारा प्रशासनाने याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.

महादेवी उर्फ माधुरी हत्तीन हा प्रश्न आता गंभीर झाला आहे. सर्व नागरिकांनी याबाबत निवेदने दिली आहेत. कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला. वनतारा जंगल प्रशासन आणि सरकारचे संयुक्त याचिका न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. ती मान्य झाल्यास महादेवी उर्फ माधुरी हत्ती पुन्हा आपल्या नांदणी मठात परत येऊ शकेल.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT