Shridi News : महायुती सरकार आल्यापासून राज्यात कट्टरतावाद वाढला आहे का? यावर बोलताना मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार झिशान सिद्दिकी यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपमधील मंत्री नीतेश राणे यांची विधाने गंभीर स्वरूपाच्या असतात. यावर बोलताना झिशान सिद्दिकी यांनी 'असे अनेक लोक आलेत अन् गेले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर दिले आहे', असा टोला लगावला.
भाजपमधील मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांची ही विधाने वैयक्तिक असतात. भाजपमधील नेते, वरिष्ठ मंत्री देखील नीतेश राणे यांच्या विधानांचे समर्थन करत नाहीत. ही त्यांची वैयक्तिक विधाने असतात. त्यांच्या या विधानाला भाजप पक्षाकडून कोणताही पाठिंबा नसतो. तरी जे काही बोलत असतील ते त्यांना मुबारक!, असा टोला झिशान सिद्दिकी यांनी लगावला. आम्ही महायुतीत जरी असलो, तरी आमची भूमिका ही स्वतंत्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा सेक्युलर पक्ष राहिला आहे. आमचा सामाजिक न्याय आणि विकासावर भर आहे, असेही झिशान सिद्दिकी यांनी म्हटले.
विशालगडावर उरूस होऊ न देण्याची भूमिका भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी घेतली होती. यावर झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) म्हणाले, "असे अनेक लोक आलेत अन् गेले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर दिले आहे. मंत्रीपदावर असताना, अशी सामाजिक तेढ निर्माण करणारे भाषा वापरणे चुकीचे आहे". याबाबत पक्षाच्या आणि महायुतीच्या बैठकीत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील लक्ष वेधणार असल्याचे झिशान सिद्दिकी यांनी सांगितले. मंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला वेगळी ओळख आणि इज्जत असते त्यांनी तरी, असे विधाने केले नाही पाहिजेत, असे झिशान सिद्दिकी यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामागे जातीवादी अँगल असल्याचे म्हटले आहे. यावर झिशान सिद्दिकी म्हणाले, "जितेंद्र आव्हाडसाहेब कधी काय बोलतील याचा नेम नाही. आव्हाडसाहेब आणि संजय राऊतसाहेब यांच्या विधानांना कितपत सिरीयस घ्यावे हा, मोठा प्रश्न आहे".
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.