नाशिक : नाशिक (Nashik) ही माझी जन्मभूमी आहे, आता तीचे कर्मभूमीत रूपांतर होणार आहे. त्यामुळे नाशिक (NMC) हे सक्षम शहर बनविण्याची जबाबदारी अधिक आहे. ती मी यशस्वी करीन. या संदर्भात स्वच्छ, सुंदर व स्वास्थ नाशिकचा नारा देतानाच आयुक्त पवार यांनी नाशिक शहरात शून्य कचरा संकल्पना (झिरो गार्बेज) राबविण्याचा निर्धार नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी केला.
ते म्हणाले, अनेक वर्षांपासून स्वच्छ व सुंदर नाशिकचे ब्रीद मिरविणाऱ्या नाशिक महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी मुंबई महापालिकेचा तीस वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन स्वच्छ, सुंदर नाशिकला स्वास्थाची जोड दिली आहे. त्यामुळे आता यापुढे स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक व स्वस्थ नाशिक हे ब्रीद राहणार आहे. मुंबईच्या धर्तीवर व्यापार- उद्योगपूरक धोरण राबविण्याबरोबरच ‘ईज ऑफ डुईंग’ बिझनेससाठी प्रयत्न केला जाणार आहे.
म्हाडा सदनिका कथित घोटाळ्यावरून कैलास जाधव यांना तडकाफडकी हटविल्यानंतर मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी (ता. २४) सकाळी रीतसर पवार यांनी पदभार स्वीकारला. खातेप्रमुखांच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, नाशिक जन्मभूमी आहे, आता कर्मभूमीत रूपांतर होणार आहे. त्यामुळे सक्षम शहर बनविण्याची जबाबदारी अधिक आहे. मुंबई, पुणे सुवर्ण त्रिकोणातील एक बाजू असलेल्या नाशिकचे धार्मिक, औद्योगिक, शैक्षणिकदृष्ट्या महत्त्व आहे. कुंभमेळ्याचे शहर म्हणून नाशिकचे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला दिशा देण्याची जबाबदारी आहे. शहर विकासासाठी शक्य ते सर्व करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. नाशिककरांना चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना शहर स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी बनविणार आहे.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. ज्या मार्गाने उत्पन्न वाढ शक्य आहे, त्या सर्व पर्यायांचा विचार केला जाईल. कर वसुलीकडे विशेष लक्ष दिले जाईल. मुंबईच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रात व्यापार व उद्योगपूरक धोरण अवलंबिले जाणार आहे. त्यात उद्योगांना तत्काळ परवानग्या उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित केली जाईल. शहरात पायाभूत सुविधा भक्कम करणार, सौंदर्यीकरणावर भर देणार, उद्दिष्ट निश्चित करून कामे करणार असल्याचे आयुक्त पवार म्हणाले.
शहरात पार्किंग प्राधिकरण
शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर असल्याने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पार्किंग ॲथॉरिटी अर्थात प्राधिकरण स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. स्मार्ट सिटीच्या कामासंदर्भातील तक्रारी लक्षात घेता या प्रकरणांकडे अधिक लक्ष देणार असल्याचे श्री. पवार म्हणाले.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.