CEO Ashima Mittal
CEO Ashima Mittal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`सीईओ`च्या आदेशाने `जिप` कर्मचाऱ्यांची झोप उडाली

Sampat Devgire

नाशिक : जिल्हा (Nashik) रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्रांचा (Medical certificates) घोटाळा (Scham) उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेतील (ZP) कर्मचाऱ्यांसह शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांनी दिला आहे. (CEO Ashima Mittal orders may create new issues to doubtfull employess)

वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे सीईओ मित्तल यांनी दिलेला कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणीचा आदेश बासनात गुंडाळला गेल्याने निश्वास सोडलेल्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयातून आंतरजिल्हा बदलीसाठी काही पोलिस अंमलदारांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविल्याचे आढळून आल्यानंतर पोलिस दलासह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील संशयित कर्मचारी व पोलिसांना अटकही झालेली आहे.

या प्रकरणात नाशिक जिल्हा रुग्णालय, धुळे येथील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त शल्यचिकित्सकांचे नाव समोर आल्याने सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय झाला होता. याच अनुषगांने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश यंत्रणेला सप्टेंबर महिन्यात दिले होते. मात्र, बनसोड यांची बदली झाल्याने ही पडताळणी बासनात गुंडाळण्यात आली होती.

जिल्हा परिषदेतील बहुतांश कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयामार्फतच प्रमाणपत्र मिळविलेले आहेत. यात अनेक बोगस प्रमाणपत्र कनेक्शन उघड होण्याची शक्यता असल्यानेच ही पडताळणी टाळली जात असल्याचे बोलले जात होते. मात्र, मित्तल यांनी दखल घेत ज्या कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केलेले आहे त्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागास दिले आहेत.

बोगस प्रमाणपत्रधारक

जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांच्या दरम्यान कर्मचारीवर्गाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून दिव्यांग दाखविले जाण्याचे प्रकार होतात. यात सोईच्या बदल्या करून घेतात. त्यामुळे सर्वांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करून घेण्याचे आदेश मिळाले आहेत. या आदेशामुळे बोगस प्रमाणपत्र दाखल करून लाभ घेतलेले कर्मचारी समोर येणार आहेत. आरोग्य विभागांतर्गत गत वर्षात २५ हून अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेतच, सोईच्या बदल्या करून घेतलेल्या असल्याचे वृत्त आहे. याशिवाय अनेक विभागातही अशा कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारींनी वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांनी बदली प्रक्रियेसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केले आहे त्यांची पडताळणी केली जाईल. तसे विभागप्रमुखांना कळविले आहे.

-आनंद पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT