Vaishali Darekar Rane sarkarnama
महाराष्ट्र

Vaishali Darekar Rane : उद्धव ठाकरेंना धक्का; वैशाली दरेकर-राणे यांचा राजीनामा! शिंदेंना दिली होती टक्कर!

Vaishali Darekar Rane Resings : वैशाली दरेकर-राणे या गेल्या दोन वर्षांपासून ठाकरे शिवसेनेच्या महिला जिल्हासंघटक म्हणून कार्यरत होत्या. मात्र, त्यांच्या राजीनाम्याने आश्चार्य व्यक्त केले जात आहे.

शर्मिला वाळुंज

Shivsena News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेला कल्याणमध्ये धक्का बसला आहे. पक्षाच्या महिला जिल्हासंघटक वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा देत तो पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

वैशाली दरेकर-राणे या गेल्या दोन वर्षांपासून ठाकरे शिवसेनेच्या महिला जिल्हासंघटक म्हणून कार्यरत होत्या. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे पदाला न्याय देता येत नसल्याचे नमूद करत त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत त्या एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या विरोधात लढल्या होत्या. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात दरेकर-राणे यांनी, "मी गेल्या दोन वर्षांपासून महिला जिल्हासंघटक या पदावर कार्यरत आहे. सध्या वैयक्तिक कारणांमुळे या पदाला योग्य वेळ व न्याय देणे शक्य होत नाही. त्यामुळे मी महिला जिल्हासंघटक पदाचा स्वेच्छेने राजीनामा देत असून तो स्वीकारावा," अशी विनंती केली आहे.

या राजीनाम्याची प्रत पक्षाचे संपर्कप्रमुख गुरुनाथ खोल यांनाही देण्यात आली आहे. दरेकर-राणे यांच्या राजीनाम्यामागे केवळ वैयक्तिक कारणे आहेत की त्यामागे अन्य काही राजकीय घडामोडी आहेत, याबाबत अद्याप पक्षाकडून कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली परिसरात विविध पक्षांमध्ये सुरू असलेले पक्षांतर, संघटनात्मक बदल आणि आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या राजीनाम्याकडे विशेष लक्ष लागले आहे. ठाकरे शिवसेना या राजीनाम्यानंतर महिला संघटनेची धुरा कोणाकडे सोपवते आणि दरेकर-राणे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत काय निर्णय होतो, याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT