Nana Patole Assembly Session News Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Winter Session : विधिमंडळात वाल्मिक कराडचीच चर्चा, नाना पटोलेंनीही केले गंभीर आरोप..

Valmik Karad was discussed in the legislature : या सगळ्या प्रकरणाच्या मागचा मास्टर माईंड वाल्मिक कराड हाच असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आज या विषयावरील चर्चेत नाना पटोले यांनी सहभाग घेत वाल्मिक कराड याची कुंडलीच मांडली.

Jagdish Pansare

नागपूर : महाराष्ट्रात सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर नागपूरच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात सध्या वाल्मिक कराड या एकाच नावाची चर्चा सुरू आहे. सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर बीड जिल्ह्यातील मस्साजोग खून प्रकरणावरून आरोप केले जात आहे.

बीड जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी केलेली असताना आज काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी वाल्मिक कराड उद्या आमदार म्हणून या सभागृहात येऊन बसला तर आश्चर्य वाटायला नको असे म्हणत कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केला. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवसापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणावर चर्चा सुरू आहे.

या सगळ्या प्रकरणाच्या मागचा मास्टर माईंड वाल्मिक कराड हाच असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आज या विषयावरील चर्चेत नाना पटोले यांनी सहभाग घेत वाल्मिक कराड याची कुंडलीच मांडली. सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर हत्या महाराष्ट्राला कलंक लावणारी आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न या निमित्ताने सुरू असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

वाल्मिक कराड नावाच्या गुंडाला ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, अशा व्यक्तीला सरकार पोलीस सरंक्षण देतं ही लाजीरवाणी गोष्ट आहे. महायुती सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात राज्यात गुंडगिरी वाढली आहे. परळीत याआधी आंधळे आणि गिते यांच्यात गोळीबार झाला होऊन एकाचा खून झाला होता. त्यामागेही वाल्मिकी कराडच होता, असा आरोप नाना पटोले यांनी केला. या घटनेच्या वेळी जे पोलिस अधिकारी परळीत कार्यरत होते तेच पाटील-महाजन आज या केजमध्ये तिकडे कार्यरत आहेत.

त्यांच्याच काळात संतोष देशमुखची क्रूरपणे हत्या झाली आहे. याचा अर्थ वाल्मिक कराडच्या आदेशानेच पोलिसांची परळीत नियुक्ती केली जाते की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. वाल्मिक कराडच्या डोक्यावर एका मंत्र्यांचा हात असल्याची चर्चा होत आहे, यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी पटोले यांनी केली. वाल्मिक कराड यांची आपण माहिती घेतली, तेव्हा यातून जे समोर आले ते भयनाक आहे.

परळीत कोणावर गुन्हा दाखल करायचा हे हा कराड ठरवतो, असा आरोप पटोले यांनी सभागृहात केला. गेल्या दोन दिवसांत बीडमधील पोलिसांना 200 लोकांवर याच कराडेने गुन्हे दाखल करायला लावले , अशी आपल्याला माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? पोलीस शासनाचे ऐकतात की गुंडाचे? असा सवालही त्यांनी केला. विधानसभेचे आमदारही वाल्मिक कराडच्या 'आका'च नाव घ्यायला घाबरत असल्याचे पटोले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT