Congress News : विधानसभेचा पराभव भोवणार, काँग्रेसमध्ये मोठे बदल; प्रदेशाध्यक्ष पदासाठी 'या' पाच नावांची चर्चा

Political News : राज्यात आघाडीला केवळ 46 जागा मिळाल्या तर फक्त 16 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे.
Congress Candidates 2024
Congress Candidates 2024Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यातच काँग्रेसचे मोठे पानीपत झाले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या निवडणुकीत एकीकडे महायुतीला मोठे यश मिळाले असताना महाविकास आघाडी बॅकफूटवर आली आहे. राज्यात आघाडीला केवळ 46 जागा मिळाल्या तर फक्त 16 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून या पराभवाचे चिंतन सुरु झाले आहे. त्यातच आता काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत तर प्रदेशाध्यक्ष पदासाठी पाच जणांची नावे चर्चेत आहेत. (Congress News)

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सध्या काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) लवकरच प्रदेशाध्यक्ष बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी काँग्रेसचा विधिमंडळ गटनेता निवडीबाबत नागपूरमध्ये बैठक घेतली. यावेळी विधानसभेच्या 16 आमदार तर विधानपरिषदेच्या 7 आमदारासोबत चर्चा केली. त्यासोबतच या निवडणुकीत पराभूत झालेल्या नेतेमंडळींची भेट त्यांनी घेतली. यावेळी त्यांची मते जाणून घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसचा गटनेता निवडला जाईल, असे वाटत असताना ही निवड लांबणीवर पडली आहे.

Congress Candidates 2024
Chhagan Bhujbal : 'पुन्हा लढू, हा लढा मंत्रिपदाचा नाही, तर अस्मितेचा...'; छगन भुजबळांचा सूचक इशारा

आठ दिवसापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. मात्र अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. त्यातच नाना पटोले (Nana Patole) यांनी विधिमंडळात गटनेता व्हायचे असल्याने प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून आता मोठी रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. त्यामुळे आता नाना पाटोलेच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.

Congress Candidates 2024
Chhagan Bhujbal Video : फडणवीसांच्या संकटमोचकाचे मोठे विधान, म्हणाले 'छगन भुजबळ यांची नाराजी परवडणार नाही'

नाना पटोले यांच्या जागी आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची चर्चा रंगली आहे. यामध्ये विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सुनील केदार या पाच जणासह इतर काही नावांची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे नाना पटोले यांची गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. तर मुख्य प्रतोद पदी अमित देशमुख यांची निवड होणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे .

Congress Candidates 2024
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी पुढची दिशा ठरवली ? म्हणाले, 'या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार'

गटनेतेपद पटोलेंकडे देण्यास विरोध?

नाना पटोले हे विधिमंडळातील गटनेतेपद मिळवण्यासाठी आग्रही आहेत. पण याला काँग्रेसच्या इतर नेत्यांकडून विरोध केला जात आहे. त्यांना विधिमंडळ गटनेता करण्याबाबतचा निर्णय हायकमांड घेणार आहे. याबाबत दिल्लीत निर्णय घेतला जाणार आहे. पटोले यांच्या नावाला वडेट्टीवार यांचा विरोध आहे. त्यामुळे आता काँग्रेस हायकमांड या निवडीबाबत निर्णय घेणार असल्याचे समजते.

Congress Candidates 2024
Kolhapur Politics : शिवसेना अन् राष्ट्रवादीला 'बूस्टर डोस'; नवीन नेतृत्व तयार करण्याचे मोठे आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com