Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने रविवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमधून 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली गेली आहे. महाविकास आघाडीत समावेश गणित फिस्कटल्यानंतर आता 'वंचित'ने राज्यभरातील लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर करणे सुरू केले आहे.
हिंगोली : बी. डी. चव्हाण, लातूर: नरसिंगराव उदगीरकर, सोलापूर: राहुल गायकवाड, माढा: रमेश बारस्कर, सातारा: मारुती जानकर, धुळे :अब्दुल रहमान, हातकणंगले : दादासाहेब पाटील, रावेर: संजय ब्राह्मणे, जालना: प्रभाकर वाकडे, मुंबई उत्तरमध्य : अमोल हसन खान, रत्नागिरी सिंधुदुर्ग: काका जोशी
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!
दरम्यान 'वंचित' काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार 'वंचित'ने कोल्हापूर आणि नागपूरच्या जागेवर काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. 'वंचित' नांदेडच्या जागेवर काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नांदेडच्या काँग्रेस उमेदवाराला 'वंचित' पाठिंबा देईल की नाही या विषयी आंबेडकर म्हणाले, काँग्रेस मधील वरिष्ठ या विषयी काही मागणी करत नाही तोपर्यंत नांदेडच्या उमेदवाराला वंचितचा पाठिंबा राहणार नाही, त्यामुळे काँग्रेस आता काय भूमिका घेते याकडे नांदेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
नितीन गडकरी हे नागपुर येथुन पडणार आहे. याचे दुःख काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावरुन दिसुन येत आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हे भाजप चे हस्तक असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.