Prakash Ambedkar : नाना पटोले भाजपचे 'हस्तक'; प्रकाश आंबडेकरांचा गंभीर आरोप

VBA on Congress: नाना पटोले यांनी वंचितला महाविकास आघाडीत का समाविष्ठ केले नाही, याचा गौप्यस्फोट वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत केला आहे.
Prakash Ambedkar, Nana Patole, Ashok Chavan
Prakash Ambedkar, Nana Patole, Ashok Chavan Sarkarnama

Loksabha Election 2024 : नितीन गडकरी हे नागपुर येथुन पडणार आहे. याचे दुःख काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावरुन दिसुन येत आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हे भाजप चे हस्तक असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर भुमिकांमुळे वंचित महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकली नाही, असा गौप्यस्फोट आज आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेस च्या वरिष्ठांनी पटोले यांच्या भुमिकांची गांभीर्याने दखल घ्यावी असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.

काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भंडारा - गोंदिया या जागेवर लढण्याचा आदेश दिला होता. तो आदेश नाना पटोले यांनी धुडकावुन लावला. त्याची ही भुमिका भाजपला मदत करणारी आहे. इतकेच नाही तर वंचितने नागपुर येथे विकास ठाकरे यांना पाठिंबा देत काँग्रेस उमेदवाराचे हात भक्कम केले. वंचित च्या पाठिंब्याने विकास ठाकरे यांनी दोन लाखांनी मतदानात वाढ होईल असा दावा केला आहे. असे असताना नाना पटोले यांनी नागपुरातुन भाजप उमेदवार नितीन गडकरी हे पडण्याचे दुख व्यक्त केल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा आम्ही घोषित केला आहे. दिल्ली स्थित नेत्यांनी इतर पाच जागांची यादी घोषित करावी त्यानंतर आम्ही त्या पाच जागांवर वंचित चा पाठिंबा घोषित करु असे ही आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar, Nana Patole, Ashok Chavan
Girish Mahajan News: गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले 'अन्यथा तुमचाच पिक्चर...'

वंचितला महाविकास आघाडीत न घेण्यामागे नाना पटोले यांचे भाजप प्रेम आडवे आल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेस च्या काही नेत्यांचे भाजप नेत्यांसोबत लागेबांधे असल्याने वंचितला महाविकास आघाडीत घेतले गेले नाही. असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. इतक्यावर आंबेडकर थांबले नाही तर त्यांनी वंचित महाविकास आघाडीत आली असती तर भाजपचे सर्वाधिक नुकसान झाले असते. भाजपचे नुकसान टाळण्यासाठी नाना पटोले यांनी वंचितला महाविकास आघाडीत स्थान दिले नाही,असे म्हणत आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नाना पटोले यांनी नांदेड येथे दिलेला उमेदवार हा अशोक चव्हाण यांच्यासोबत 'मॅचफिक्सिंग' करत दिल्याचा गंभीर आरोप आंबेडकर यांनी केला आहे. नांदेड च्या काँग्रेस उमेदवाराला वंचित पाठिंबा देईल की नाही या विषयी आंबेडकर यांनी खुलासा केला नाही. जो पर्यंत काँग्रेस मधील वरिष्ठ या विषयी काही मागणी करत नाही तो पर्यंत नांदेड च्या उमेदवाराला वंचित चा पाठिंबा राहणार नाही असे ही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत भाजप नेते नितीन गडकरी यांच्या पराभवाचे दुःख काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना असुन त्यांचे भाजप प्रेम आता चव्हाट्यावर आल्याचा दावा आंबेडकर यांनी केला आहे. नाना पटोले यांना भाजपविरोधात लढायचे नाही, असा दावा देखील आंबेडकर यांनी आज अकोल्यातील पत्रकार परिषदेत केला. वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपानंतर यावर काँग्रेस नेते नाना पटोले हे काय उत्तर देतात याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. इतकेच नाही तर काँग्रेस हायकमांड आंबेडकर यांच्या आरोपाची कितपत दखल घेते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. नाना पटोले यांचे अशोक चव्हाण यांच्यासोबतचे मॅचफिक्सिंग च्या आरोपानंतर भाजप खा. अशोक चव्हाण याला काही उत्तर देतात की नाही याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Prakash Ambedkar, Nana Patole, Ashok Chavan
Lok Sabha Election 2024 : "माझा नेता 'पलटुराम' निघाला..." ; शिवतारेंना कार्यकर्त्याचं खरमरीत पत्र!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com