Maharashtra political news : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना, खळबळ उडवून देणारं विधान केलं आहे. दुसरा 'गोधरा' घडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
'राज्यातील महापालिकांचे विश्लेषण करताना मीडिया मुसलमानांच्या हाती राजकारण जात आहे. आता हिंदूंनी सावध राहावे आणि तलवारी काढून राहावे, असं ध्रुवीकरण करताना दिसत आहे. म्हणून मी म्हणतो, की देशभरामध्ये दुसरा ‘गोधरा’ घडण्याची शक्यता दिसते,' असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबईतील माध्यमांशी संवाद साधताना, देशातील सध्याची सामाजिक, राजकीय, परराष्ट्रीय, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे विश्लेषण करताना, अग्निवीर जवानांसाठी मोठी मागणी केली. याच वेळी देशात दुसरा ‘गोधरा’ होईल, असं भाकीत वर्तवलं.
'महाराष्ट्राच्या (Maharashtra) महापालिका निवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण करताना त्यांनी माध्यमांनी चुकीचे चित्र रंगवल्याचे सांगितले. मुस्लिम समाज आता काँग्रेससोबत राहिलेला नाही. त्याने ‘AIMIM’चा पर्याय निवडला आहे. माध्यमे सांगत आहेत, की ‘AIMIM’च्या 123 जागा आल्या. जसे काय हे पहिल्यांदाच आले. पण वास्तव हे आहे, की जेव्हा मुस्लिम समाज काँग्रेस किंवा इतर पक्षांसोबत होता, तेव्हा मुस्लिम प्रतिनिधींची संख्या 240 ते 250च्या आसपास असायची,' याकडे प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधलं.
'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, मुस्लिम प्रतिनिधींच्या जागा प्रत्यक्षात कमी झाल्या आहेत. पण मीडिया मात्र सामान्य माणसाला असे दाखवण्याचा प्रयत्न करतो, की मुसलमानांच्या हाती राजकारण जात आहे आणि आता हिंदूंनी सावध राहावे आणि तलवारी काढून राहावे, असं ध्रुवीकरणाचे राजकारण मला दिसते. म्हणून मी म्हणतो, की देशभरामध्ये दुसरा ‘गोधरा’ घडण्याची शक्यता मला दिसते,' असे खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले.
इतिहासाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावताना आंबेडकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या दोघांचाही लढा ब्रिटिशांविरोधात होता. टिपू सुलतानला हरवण्यासाठी पेशवे कोणासोबत सामील झाले होते, हा इतिहास मुख्यमंत्र्यांनी वाचावा. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी लिहिलेला इतिहास वाचला तरी चालेल, म्हणजे मुख्यमंत्री अशी चुकीची वक्तव्ये करणार नाहीत, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
अग्निवीर योजनेच्या घटनात्मक वैधतेबाबत आंबेडकर यांनी, या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. आम्ही न्यायालयात बाजू मांडली असता, कोर्टाने दुसऱ्या बाजूला नोटीस बजावून पुन्हा बाजू मांडण्यास सांगितले आहे. आमचा प्रयत्न आहे, की ‘अग्निवीर’चा मुद्दा लवकर सुनावणीला यावा. केंद्र सरकारला लष्करी भरतीचे अधिकार ‘इंडियन आर्मी ॲक्ट’मधूनच मिळतात. ते म्हणाले की एकदा का तुम्ही जवानाला युद्धभूमीवर (बॅटल फिल्ड) घेऊन गेलात, की त्याला ‘आर्मी ॲक्ट’ लागू होतोच. त्यामुळे सीमेवर लढताना हुतात्मा होणाऱ्या अग्निवीर जवानाला पूर्ण मोबदला आणि सन्मान मिळाला पाहिजे, यासाठी आमची कायदेशीर लढाई सुरू आहे, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.