Dharashiv Zilla Parishad politics : सत्ता स्थापनेचा मॅजिक आकडा जुळला? भाजपचं ठरलं; धाराशिव झेडपीत शिंदे शिवसेना सत्ताबाहेर?

BJP Ropes in Dhananjay Sawant to Block Eknath Shinde Shiv Sena in Dharashiv ZP Power Game : धाराशिव जिल्हा परिषदेत दोन्ही शिवसेनेला सत्ताबाहेर ठेवण्यासाठी भाजपने बहुमताच्या आकड्यासाठी जुळवाजुळव केली.
Dharashiv ZP
Dharashiv ZP Sarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena vs BJP Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद काबिज करण्यासाठी भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि एकनाथ शिंदे शिवसेना सोडून, मॅजिक आकडा गाठला आहे. यात सत्ता वाटप झाल्यास, एकनाथ शिंदे शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवत भाजप सत्तेत जाण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून महायुतीत तणाव वाढला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांना रोखण्यासाठी भाजपने ही फिल्डिंग लावण्याची चर्चा आहे. यात आमदार सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची भूमिका चर्चेत आली आहे.

धाराशिव जिल्हा परिषदेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही शिवसेनेला बाजूला सारून बहुमताच्या आकड्याचं गणित जुळवलं आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. यातून विशेष करून, भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना मित्रपक्षात तणाव वाढला आहे.

भाजपने (BJP) सत्ता स्थापनेसाठी लागत असलेल्या बहुमताच्या गणितासाठी अजित पवार राष्ट्रवादी, अपक्षांना सोबत घेतलं आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे शिवसेनेवर दबाव आणण्याचा हा प्रकार सुरू आहे, अशी चर्चा धाराशिवच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Dharashiv ZP
Industrialist extortion case : मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश, ‘कायद्याने ठोकून काढा’; अरुण गवळीच्या पंटरची पहिली विकेट, MIDC मधील खंडणी प्रकरण तापणार!

दरम्यान, भाजपविरोधी भूमिका असलेल्या माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत भाजपसोबत गेले आहे. त्यामुळे धनंजय सावंत यांची भूमिका चर्चेत आली आहे. यातून धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Dharashiv ZP
HSC exam controversy : बारावीच्या पेपरात सामूहिक कॉपीचा महाभंडाफोड; 581 विद्यार्थ्यांची एकच उत्तरे, 26 शिक्षक निलंबित

महायुतीच्या वरिष्ठांच्या हालचालींकडे लक्ष

भाजपने स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदे शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची पक्की रणनीती आखली आहे, अशा चर्चांना जोर धरला असतानाच, अंतिम निर्णयासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली होतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे महायुतीमधील वरिष्ठांच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.

भाजप-शिंदे सेनेत असा प्रस्ताव

भाजपचा अध्यक्ष असताना एकनाथ शिंदे शिवसेनेचा उपाध्यक्ष, आणि शिंदे शिवसेनेचा अध्यक्ष असताना भाजपचा उपाध्यक्ष राहील. याचबरोबर मित्रपक्ष असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना सभापती पद देऊन सत्तेत सहभागी करून घेण्याचा प्रस्तावही चर्चेत आहे.

अध्यक्षपदासाठी यांची नावे चर्चेत

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून अर्चना पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्या भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. तर एकनाथ शिंदे शिवसेनेकडून उषा गायकवाड यांचे नाव चर्चेत आहेत. त्या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com