Narendra Bhondekar
Narendra Bhondekar Sarkarnama
विदर्भ

Bhondekar To Shinde-Fadnavis: बाहेरचा मंत्री दिल्यास १०० टक्के विरोध करणार; आमदार भोंडेकरांचा थेट शिंदे-फडणवीसांना इशारा!

सरकारनामा ब्यूरो

Bhandara News : मला जर मंत्रिपदाची संधी मिळणार नसेल तर भाजप किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्याला ही संधी मिळावी. त्या कार्यकर्त्याला मंत्रिपदी बसवावं. पण कोणत्याही परिस्थितीत जिह्याबाहेरचा पालकमंत्री लादल्यास याला माझा 100 टक्के विरोध असणार, असा इशाराच भंडाऱ्यातील (Bhandara) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सरकारला विरोधाचा सामना करावा लागणार अशी चिन्हे आहेत.

'बाहेरचा पालकमंत्री दिल्यास 100 टक्के विरोध करणार -

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन आता वर्षभराचा कालावधी होत आला आहे. अद्यापही मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर आता आमदार भोंडकरांनी आपल्याच सरकारला कडक इशारा दिला आहे.

"जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर जिल्ह्यातलाच पालकमंत्री असणे अपेक्षित आहे. मला मंत्रीपदाची संधी देणार नसाल, तो जिल्ह्यातलाच सामान्य कार्यकर्त्याला मंत्रिपद मिळायला हवे. इतरत्र जसे पालकमंत्र्यांची निवड करता तोच निकष भंडारा जिल्ह्याला पालकमंत्री नेमताना द्यावा. यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री हा स्थानिकच असायला हवा, अशा मागणीला माझी संमती आहे. मात्र जिल्ह्याबाहेरचा पालरमंत्री दिल्यास १०० ट्कके विरोध होणारच, " असं आमदार भोंडेकर म्हणाले.

आता मंत्रिमंडळ विस्तार व्हायलाच हवा -

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर व्हायलाच हवे, असं मलाच नाही तर सर्वच आमदारांना वाटतं. वर्षभराचा काळ लोटून गेला, तरीही केवळ 20 मंत्र्यांवरच राज्य-कारभार सुरू आहे. आता तर पुर्ण क्षमतेनचे मंत्रिमंडळ विस्तार झाले पाहिजे. याचा निर्णय लवकर झाला पाहिजे.

या विस्तारामध्ये भंडारा जिल्ह्यावर कोणताही अन्याय होऊ नये. आतापर्यंत बाहेरचाच पालकमंत्री नेमल्याने भंडाऱ्याचा विकास घडून आलेला नाही, अशी खंत नरेंद्र भोंडेकरांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT