Dharmaraobaba Atram Ajit Pawar sarkarnama
विदर्भ

NCP Politics : विधानसभेला 100 टक्के यशाचा प्लॅन, अजित पवार गटाच्या मंत्र्याने सांगितली स्ट्रॅटेजी

NCP Politics Ajit Pawar Dharmaraobaba Atram : विधानसभेची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरू केली आहे. लोकसभेतील अपयश विसरून ते मतदारसंघ निहाय आढावा घेत आहेत. राष्ट्रवादीकडून 288 जागांवर सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Roshan More

NCP Political News : महायुतीमध्ये जागा वाटप कसे होणार? याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेला 100 टक्के यश मिळवण्याची स्ट्रॅटेजी सांगितली आहे.

अजित पवार गट 80 जागांवर लढणार असून 100 यश मिळणाऱ्या 80 जागांचे सर्व्हेक्षण करण्यात येत असल्याचे मंत्री आत्राम यांनी सांगितले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार गट हा 80 जागा लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.

विधानसभेची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी सुरू केली आहे. लोकसभेतील अपयश विसरून ते मतदारसंघ निहाय आढावा घेत आहेत. राष्ट्रवादीकडून 288 जागांवर सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये आता धर्मरावबाबा आत्राम यांनी 100 टक्के जिंकणाऱ्या 80 जागांवर लक्ष केंद्रीत केले असल्याचे सांगितले आहे.

विदर्भात 20 जागा लढणार

आत्राम Dharmaraobaba Atram म्हणाले की, विदर्भामधील 20 जागा आम्ही लढणार आहोत. सहा जागांवर आमचे आमदार आहेत. तर, अजून 14 जागा कोणत्या लढायच्या हे आम्ही लवकरच निश्चित करणार आहोत. विधान परिषदेला क्राॅस व्होटिंग करणाऱ्यांना देखील संधी देणार असल्याचे आत्राम यांनी सांगितले.

अनिल देशमुखांच्या विरोधात देशमुख

शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात देशमुख कुटुंबातीलच उमेदवार देणार असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी स्पष्ट केले. विधानसभेला अजून वेळ आहे. देशमुख कुटुंबातील व्यक्तीचा आमच्या पक्षात प्रवेश झालेला नाही. मात्र विधानसभेला अनिल देशमुख यांच्या विरोधात देशमुख परिवारातीलच उमेदवार असेल असे आत्राम यांनी ठासून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT