Dharmaraobaba Atram : तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व अजित पवार करणार? महायुतीतील मंत्र्याने खरं खरं सांगून टाकलं

Dharmaraobaba Atram Ajit Pawar Third Front : महायुतीला तिसऱ्या आघाडीची गरज नाही. आमची युती मजबूत आणि सक्षम असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमचे 200 आमदार निवडून येणार आहे, असा दावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.
Dharmaraobaba Atram Ajit Pawar
Dharmaraobaba Atram Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Dharmaraobaba Atram News : राज्यात सध्या तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच तिसरी आघाडी स्थापन करून विधानसभेच्या निवडणुका लढणार असल्याचे जाहीर केले आहे. आता अजित पवार तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. या चर्चांना अजित पवार गटाचे नेते, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी उत्तर दिले आहे.

'महायुतीला तिसऱ्या आघाडीची गरज नाही. आमची युती मजबूत आणि सक्षम असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमचे 200 आमदार निवडून येणार आहे. तिसऱ्या आघाडीची चर्चा निव्वळ अफवा आहे.', असे धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.

तिसऱ्या आघाडीत कुठलेच तथ्य नाही. हे कुणाच्या तरी डोक्यातून निघालेली कल्पना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला तिसऱ्या आघाडीची गरजच नाही. छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीला राजकीय घेण्याची गरज नाही. शरद पवार यांच्यासोबत आम्ही अनेक वर्षे काम केले आहे. भुजबळ ओबीसींचे नेते आहेत. आरक्षणासंदर्भात ते काही चर्चा करण्यासाठी गेले असतील, असे आत्राम यांनी सांगितले.

आत्राम यांनी आपल्या अहेरी मतदारसंघातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल 250 एकर जमीन दान केली आहे. या जागेवर सूरजागड इस्पात नावाचा कारखाना उघडण्यात येत आहे. या माध्यमातून आठ ते दहा हजार युवकांना येथे रोजगार उपलब्ध होणार आहे. 17 ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कारखान्याचे भूमिपूजन होणार आहे.

Dharmaraobaba Atram Ajit Pawar
Chhagan Bhujbal On Eknath Shinde : छगन भुजबळांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला; म्हणाले, 'आरक्षण अन् अभ्यास...'

या संदर्भात माहिती देताना यांनी कंपनीला जागा देताना अहेरी मतदारसंघातील युवकांना रोजगार देताना प्राधान्य द्यावे लागेल ही अट घातली असल्याचे सांगितले. याचा अर्थ इतर जिल्ह्यातील रोजगार देणार नाही असा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांनी चमत्कार केला

विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 39 आमदार आहेत. दोन अपक्ष आमदार आमच्यासोबत होते. आम्हाला अतिरिक्त सहा मतांची गरज होती. ती आम्ही बाहेरून मिळवली. हा चमत्कार आमचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असल्याचे बाबा आत्राम यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Dharmaraobaba Atram Ajit Pawar
Governor Appointed Legislature News : राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी घडामोडींना वेग; 'मविआ' सरकारने दिलेल्या जुन्या यादीचे काय ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com