Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis sarkarnama
विदर्भ

बच्चू कडू आक्रमक होताच शिंदे-फडणवीसांनी दिले 495 कोटी

सरकारनामा ब्यूरो

Bacchu Kadu News : अमरावती जिल्ह्यातील सपन मध्यम प्रकल्पालाठी राज्य सरकारने 495.29 कोटींची सुधारीत मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे सहा हजार 134 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळाला आहे. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या मतदारसंघातील हा प्रलंबित प्रकल्प आहे. बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी हा प्रकल्प मंजूर केला गेला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते. नवे सरकार स्थापन झाल्यावर मंत्रिपदी संधी मिळेल, अशी त्यांना अपक्षा होती. पहिल्या विस्तारात कडू यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर आमदार रवी राणा यांनी गुवाहाटीच्या संदर्भाने पैशांचा आरोप केल्यानंतर बच्चू कडू आक्रमक झाले होते. त्यांनी या संदर्भात अमरावतीमध्ये मोठा मेळावा घेत शक्तीप्रदर्शनही केले होते.

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादाचा विषय राज्यभर गाजला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीनंतर रवी राणा आणि बच्चू कडू एक पाऊल मागे घेतले. आता शिंदे-फडणवीसांनी बच्चू कडूंना रिटर्न गिफ्ट दिले. अचलपूर सपन प्रकल्पाला 495.29 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

अमरावती जिल्ह्यातील सपन प्रकल्प 495.29 कोटींची सुधारीत मान्यता देण्याचा झाला आहे. या संदर्भात बच्चू कडू यांनी ट्वीटही केले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सहा हजार १३४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT