Nagpur voter increase Sarkarnama
विदर्भ

Nagpur voter increase : फडणवीस, बावनकुळे यांच्या मतदारसंघात पुन्हा मतदार वाढले; काँग्रेसची चिंता वाढणार

80,000 New Voters Added in NagpurBJP CM Devendra Fadnavis & Chandrashekhar Bawankule : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात वाढलेल्या मतदारांवरून पुन्हा राजकारण तापू शकते.

Rajesh Charpe

Nagpur politics news : विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते सातत्याने मतदार याद्यांवर संशय घेतला जात आहे.

पाच वर्षांत जेवढे मतदार वाढले नाहीत तेवढे लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या दरम्यान पाच महिन्यांच्या कार्यकाळात कसे काय वाढले? असा काँग्रेसचा सवाल आहे. यावर आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता नागपूर जिल्ह्यात आणखी 80 हजार मतदार वाढल्याचे समोर आले आहेत.

नागपूर (Nagpur) महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे समीकरण या वाढीव मतदारांमुळे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष काँग्रेसचा मुख्य आक्षेप असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन हजार, तर महसूमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघात तब्बल 11 हजार मतदार वाढले आहेत.

राज्य निवडणूक (Election) आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या निवडणुकीसाठी एक जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे सांगितले. या अद्यावत यादीनुसार नागपूर जिल्ह्यात 79 हजार 982 मतदार वाढले आहेत. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 14 हजार 671 तर त्या खालोखाल हिंगणा विधानसभा मतदारसंघात 11 हजार 469 मतदार वाढले आहेत.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघाची चांगलीच चर्चा झाली होती. राहुल गांधी यांनी आपल्या आरोपात कामठी विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख केला होता. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मजुरांना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मतदार केले असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. फक्त आधार कार्डाच्या दाखल्यावर त्यांना मतदार करण्यात आले, स्थानिक रहिवासी पुरवा त्यांच्याकडे नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

फडणवीसांच्या मतदारसंघात वाढ

या मतदारसंघात आता 11 हजार 80 मतदारांच्या संख्येत भर पडली आहे. कमठीच्या शेजारीच असलेल्या उमरेड विधानसभा मतदारसंघात मात्र फक्त 339 मतदार वाढले आहेत. काटोल, सावनेर या विधानसभा मतदारसंघात सरासरी चार हजार, रामटेकमध्ये सुमारे तीन हजार मतदारांची संख्या वाढली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात 3 हजार 80 मतदार वाढले आहेत.

वाढीव मतदारांवर शंका

राहुल गांधी फडणवीस यांच्याही मतदारसंघातील मतदार यादीवरही आक्षेप घेतला होता. काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल गुडधे यांनी पत्रकार परिषद घेऊन बोगस मतदारांचा आकडा समोर आणला होता. ऑन लाइन आणि ऑफ लाइन नोंदणीचा डेटा त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागितला होतात. सोबतच एकाच मोबाईल क्रमांकावरून 40 ते 100 मतदारांची नोंदी करण्यात आली. त्याची शहानिशा करण्यात आली नसल्याचा सांगून त्यांनी या वाढीवर मतदारांवर शंका घेतली आहे. पश्चिम नागपूरमध्ये पाच हजार 952, पूर्व नागपूरमध्ये तब्बल 10 हजार 298 तर मध्य नागपूरमध्ये 4 हजार 499 मतदार वाढले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT