communist party of india Sarkarnama
विदर्भ

Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीला मोठा धक्का! 'भाकप'चा स्वबळाचा नारा

Rajesh Charpe

Nagpur News, 27 July : महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनच मोठे पक्ष आपापसात जागावाटपाची बोलणी करतात. इतर कोणाला विचारत नाहीत. सन्मान देत नसल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विधानसभेच्या राज्यात एकूण 16 जागा लाढण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

'भाकप'च्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) फूट अटळ मानली जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली होती. देशभरातील छोटे-मोठे पक्ष मतभेद विसरून एकत्र आले होते. आणि त्यांनी भाजपवर दबाव वाढवला होता.

याचे चांगले निकाल लोकसभेच्या (Lok Sabha) निवडणुकीत बघायला मिळाले. भाजपला (BJP) स्वबळावर सत्ता स्थापन करण्यापासून रोखण्यात यश मिळाले. या यशात छोट्यामोठ्या पक्षांचाही वाटा आहे. याचा विसर आता बड्या पक्षांना पडायला लागला आहे.

अशातच आता महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (Shivsena) हे तीनच पक्ष परस्पर सर्व निर्णय घेत असल्याचं भाकपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर विचार करण्यासाठी नाशिकमधील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात राज्य परिषद बैठक घेण्यात आली.

या बैठकीत राज्यातील सर्व जिल्ह्यातून 60 पेक्षा अधिक परिषद सदस्य सहभागी झाले होते. यात नागपूरमधून कॉ. शाम काळे, कॉ. अरुण वनकर, डॉ. युगल रायलु, संजय राऊत याचा समावेश होता. या बैठकीत महाविकास आघाडीने सन्मानजक जागेच्या वाटाघाटीसाठी ताबडतोब बोलणी करावी, अन्यथा आम्ही निवडणूक लढण्यास मोकळे असल्याचा इशारा इंडिया आघाडीला देण्यात आला.

आघाडीने जागा वाटपासाठी बोलणी केली नाही, तर राज्यातील एकूण 16 जागा लढण्याची तयारी यावेळी दर्शवण्यात आली. यात विदर्भातून पाच ते सहा, मराठवाड्यातील तीन, मुंबईतील एक व पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील काही जागांवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसंच ज्या मतदारसंघात भाकपचे उमेदवार असतील तिथे दुसऱ्या कुठल्याच पक्षाला समर्थन जाहीर करायचे नाही असंही भाकपच्या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे भाकप जर आघाडीतून बाहेर पडला तर विधानसभेला त्याचा मोठा फटका आघाडीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT