Bachchu Kadu On Cabinet Expansion Sarkarnama
विदर्भ

Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडूंनी काढली 'कारल्याच्या कविते'ची आठवण; म्हणाले...

Bachchu Kadu On Cabinet Expansion: "कारल्याला काही कारलं येत नाही अन् सुनबाई काही माहेरी जात नाही..."

सरकारनामा ब्यूरो

Political News: गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत. तर मंत्रिमंडळात संधी मिळावी, यासाठी अनेक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. अशातच आता येत्या 19 जूनच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

मंत्रिमंडळाचा विस्ताराच्या प्रश्नावर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी मिश्किल टिप्पणी करत "कारल्याला काही कारले येईना", असं उत्तर दिलं. मंत्रिमंडळाचा विस्तारावरून बच्चू कडू यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. त्यातच पुन्हा एकदा त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

बच्चू कडू म्हणाले, "राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा व्हायचा तेव्हा होईल. मात्र, राज्यात विकासकामं जोरात सुरू आहेत. माझ्या मतदारसंघात मी गेल्या 15 वर्षात जेवढी कामं केली नाहीत तेवढी काम सध्या सुरू आहेत", असं म्हणत त्यांनी एका लोकगीताच्या ओळी म्हटल्या.

मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडू काय म्हणाले?

मंत्रिमंडळ विस्तारावर मिश्किल उत्तर देत बच्चू कडू काय म्हणाले, "मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे कारल्याले कारले येऊ दे ग सूनबाई. मग जाय आपल्या माहेरा, या कवितेसारखा आहे. कारल्याला काही कारलं येत नाही अन् सुनबाई काही माहेरी जात नाही, अशी सध्या परिस्थिती आहे", असं बच्चू कडू म्हणालेत.

Edited By-Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT