Chandrapur Politics| चंद्रपूर : राज्यात शिंद-भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून दोन्ही गटात मेगाभरती सुरु आहे. राज्यभरातून शिंदे-भाजप गटात मोठे पक्षप्रवेश होत आहेत. असे असतानाच चंद्रपूरमध्ये माजी नगरसेवकाने अजय सरकार या अपक्ष नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण त्यांच्या पक्षप्रवेशाची जिल्ह्यात जोरदार चर्चाही रंगली आहे.
याचे कारण म्हणजे, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अजय सरकार यांच्यावर हत्या-दंगली यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत विशेष म्हणजे कॅबिनेटमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतच या नगरसेवकाने भाजपमध्ये जंगी प्रवेश सोहळा पडल्याने चंद्रपूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
भाजप वाशिंग मशीन असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. अशात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माजी नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने चंद्रपूरमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. हत्या-दंगली सारखे गुन्हे दाखल असलेल्या अजय सरकार यांचा पक्षप्रवेश अगदी मोठ्या थाटामाटात पार पडला. गेल्या 5 वर्षांपासून चंद्रपूर भाजपची सत्ता आहे. तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकांसाठी भाजपने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.
पण दूसरीकडे हत्येच्या गुन्ह्यासह 11 गुन्हे दाखल असलेल्या अजय सरकार यांना भाजपने पक्षात घेण्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चंद्रपुरातील बंगाली कॅम्प भागात अजय सरकारचे मोठे वर्चस्व आहे. गेल्या वर्षभरात टोळीयुद्ध सदृश्य अनेक प्रकरणात अजय सरकार याचा सहभाग असल्याने भाजपने त्यांना प्रवेश कसा दिला असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.