भारताची चीनसारखी एक पक्षीय पद्धतीकडे वाटचाल; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली चिंता

Prakash Ambedkar | ईडीकडून काही राजकीय पक्ष संपविण्याचा प्रयत्न चाललाय
 Prakash Ambedkar |
Prakash Ambedkar |
Published on
Updated on

Prakash Ambedkar | पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये काल (ता.१५) संध्याकाळी प्रथमच धम्मचक्र प्रवर्तन मेळावा झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. त्यानंतर रात्री मिडियाशी बोलताना त्यांनी भाजप, आरएसएस व मोहन भागवत यांच्यावर शरसंधान केले. दरम्यान, पाऊस पडेल असा हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा न ठरल्याने निर्विघ्नपणे हा मेळावा पार पाडला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून (आरएसएस) बहूजन हा हळूहळू बाहेर पडू लागल्याने संघचालक मोहन भागवत यांना पापक्षालनाचे वक्तव्य करण्याची पाळी आली असावी. त्यातूनच ते मशिदीत गेले का याचाही अभ्यास करावा लागेल, असा टोला आंबेडकर यांनी यावेळी लगावला. भिकू इधातेंसारखा भटक्या समाजातील व्यक्तीला संघाच्या सर्वोच्च प्रतिनिधीमंडळात घेतले जात नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 Prakash Ambedkar |
Andheri By election : भाजपचा मेगाप्लॅन ठरला ; 10 वॉर्ड अन् 10 आमदार

त्यानंतर भाजपला लक्ष्य करताना ईडीकडून काही राजकीय पक्ष संपविण्याचा प्रयत्न चाललाय.तर काही पक्ष (शिवसेना)हे फोडून संपवले जात आहे,याबद्दल त्यांनी भीती व्यक्त केली. कारण हे राजकीय पक्ष हे देशाचे प्रतिक असून ते संपविण्याचा प्रयत्न सुरु असेल,तर पुढे काय,अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. यातून आम्ही चीनसारखी एकपक्षीय पद्धतीकडे वाटचाल करीत चाललो आहोत का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तसे असेल, तर तशी मांडणी भाजप व आरएसएसने करावी,मग ती वाईट की चांगली यावर चर्चा करता येईल,असे ते म्हणाले.पण, हे एकंदरीत धोरण हे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या चुकीचे असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

भाजपची युती करून केंद्रात मंत्री झालेले रामदास आठवले यांचाही आंबेडकरांनी यावेळी शेलक्या शब्दांत समाचार घेतला. . बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्म स्वीकारायचा नव्हता,या आठवलेंच्या वक्तव्यावर बोलताना ते महान नेते आहेत,महान विद्वान आहेत.तेवढा मी महान नाही,विद्वान नाही.त्यामुळे त्यांच्या या विधानावर काय कमेंट करायची हे ठरवलेलं नाही,असे ते उपरोधिकपणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com