Nitin Gadkari Threaten News: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणातील मास्टरमाईंड अफसर पाशाला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशी नंतर काही धक्कादायम माहिती समोर आली आहे. अफसर पाशा हा 2003 -2004 मध्ये मध्य नागपुरात वास्तव्याला होता.दहशतवादी नेटवर्क वाढवण्यासाठी तो नागपूरात आला होता. यादरम्यान त्याने काही लोकांच्या भेटीगाठीही घेतल्याचे त्याने म्हटलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, बेळगावच्या तुरुंगातून अफसर पाशा हा लष्कर ये तोयबाचा स्लिपर सेल चालवत होता. लष्कर ये तोयबाच्या स्लिपर सेलची ॲक्टीव्हीटी म्हणून अफसर पाशाच्या सांगण्यावरून जयेश पुजारीने नितीन गडकरींना धमक्या दिल्याचं सांगितलं जात आहे. नागपुरातून गेल्यानंतर अफसर पाशाने 2005 मध्ये बंगळूरुमध्ये दहशतवादी हल्ला केला. अशीही माहिती आहे.
जयेश पुजारीने दोन वेळा नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात फोन करून धमक्या दिल्या होत्या गडकरी यांच्याकडे 100 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. त्याला अटक केल्यानंतर पुजारीने बेळगावच्या तुरुंगातूनही नितीन गडकरी यांना ही धमकी दिली होती. या प्रकरणी जयेश पुजारी नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे.
अफसर पाशा असे बशीरुद्दीन नूर अहमदचे गुन्हेगारी विश्वातील नाव आहे. तो कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा येथील रहिवासी आहे. अफसर पाशा पीएफआयसह कर्नाटकातील लष्कर-ए-तोयबाचे काम हाताळत होता.कर्नाटकातील लष्कर-ए-तोयबासाठी काम करणारा बशीरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा हा त्यामागचा खरा सूत्रधार आहे. 2003 ढाका बॉम्बस्फोट, 2005 बंगळुरू बॉम्बस्फोट यासह जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी काम केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पाशा 2006 पासून अटकेत असून 2014 पासून बेळगावी तुरुंगात आहे.
पाशा तुरुंगातूनच त्याचे दहशतवादी मॉड्यूल चालवत होता. त्यानंतरच तो बेळगाव कारागृहातून जयेश पुजारीच्या संपर्कात आला. त्याने जयेशचा वापर फक्त नितीन गडकरींना धमकावण्यासाठीच केला नाही तर त्याचे दहशतवादी नेटवर्क चालवण्यासाठीही केला होता. कारागृहात जयेशला सतत मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होती. जयेशला ही सेवा देण्याची जबाबदारी पाशा यांच्यावर होती.
जेलमध्ये जयेशला सर्व सेवा देण्यासाठी पाशाच्या संस्थेने वर्षभरात 18 लाख रुपये खर्च केले. फोन आणि इतर सेवांच्या बदल्यात पाशा जयेशच्या माध्यमातून अनेक ठिकाणी फोन करत होता.जयेशने तुरुंगातूनचपाकिस्तान, अमेरिका, सुदान, नायजेरिया आणि पोलंडसह भारतातील अनेक ठिकाणी फोन कॉल केल्याचे तपासात समोर आले आहे. पाशानेच कॉल केल्याचा पोलिसांना संशय आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.