Rahul Kalate Shinde Group News: अमावस्येमुळे राहूल कलाटेंचा प्रवेश तूर्तास अडला..; कलाटेंच्या मनात शिंदेच होते..

Pimpri Political News: पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार
knath shinde, Rahul Kalate
knath shinde, Rahul KalateSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Shivsena News: शिवसेना वर्षभरापूर्वी फुटून बंडखोर एकनाथ शिंदे गट राज्यात सत्तेत सामील झाल्याने उद्धव ठाकरे गटातून शिंदे शिवसेनेत इनकमिंग सुरु आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहूल कलाटे हे इतर तीन माजी नगरसेवकांसह शिवसेनेच्या वाटेवर(शिंदे गट) आहेत. अमावस्या सुरु झाल्याने त्यांचा औपचारिक प्रवेश, मात्र झाला नाही. मात्र, तो झाल्यात जमा आहे, असे कलाटे यांनी `वर्षा`बाहेर पडताच `सरकारनामा`ला सांगितले.

शिवसेनेच्या माजी नगरसेवक संपत पवार.अश्विनी वाघमारे तसेच माजी अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप हे कलाटेंबरोबर आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाणार आहेत. त्यासाठी त्यांनी रविवारी (ता. १६) रात्री उशीरा मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्याला उशीर झाला.

knath shinde, Rahul Kalate
Bachchu Kadu News : "बच्चू कडूंना मंत्री करा"; कार्यकर्त्यानं मुख्यमंत्री शिंदेंना लिहिलं रक्तानं पत्र..

शिंदेबरोबर काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर, आम्ही कलाटेंबरोबर असल्याचे जगताप म्हणाले. या प्रवेशाने पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. कारण कलाटे हे शिवसेनेतील एक स्थानिक बडे प्रस्थ आहे.

यावर्षी २६ फेब्रुवारीला झालेली चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती. पन्नास हजार मते घेतल्याने आघाडीच्या उमेदवाराचा (राष्ट्रवादीचे नाना काटे) युतीच्या (भाजप) अश्विनी जगतापांनी २६ हजार मतांनी पराभव केला होता.

तेव्हापासून कलाटे ठाकरेंवर नाराज होते. ठाकरेंनी म्हणजे आघाडीने उमेदवारी दिली असती, तर नक्की निवडून आलो असतो,असा त्यांचा दावा होता.या निवडणुकीत जगताप यांनी कलाटेंचा हिरीरीने प्रचार केला होता.

knath shinde, Rahul Kalate
Ahmednagar NCP News: हल्ल्यात जखमी झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू : भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह पाच जणांना अटक

महापालिका निवडणूक दिवाळीत होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच नगरसेवक गतवेळी पिंपरी महापालिकेत असलेल्या ठाकरे गटाची अवस्था या प्रवेशानंतर आणखी बिकट झाली आहे. कारण शहराचे प्रतिनिधीत्व करणारे मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे यापूर्वीच शिवसेनेत (शिंदे) गेलेले आहेत.

गतवेळी शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील अश्विनी चिंचवडे या भाजपमध्ये गेल्या आहेत. तर, बाकीच्यात सरळ दोन गट पडले आहेत.पण, पालिका निवडणूक जाहीर झालेली नसल्याने त्या सर्वांनी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतलेली होती.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com